---Advertisement---

फायनलपूर्वी हसन अलीच्या करामतींनी सोशल मीडियावर घातलाय गोंधळ! पाहा व्हिडिओ

On: शनिवार, सप्टेंबर 10, 2022 6:17 PM
---Advertisement---

आशिया चषक 2022 सुपर-4 फेरीच्या शेवटच्या सामन्यात पाकिस्तान आणि श्रीलंका संघ आमनेसामने होते. या सामन्यात पाकिस्तानला फेव्हरिट मानले जात होते, मात्र श्रीलंकेच्या संघाने हा सामना जिंकून क्रिकेटच्या दिग्गजांना चकित केले. श्रीलंकेने आशिया चषक 2022 सुपर-4 फेरीतील तिन्ही सामने जिंकले. आशिया कप 2022 चा अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी होणार आहे. आशिया कप 2022 च्या अंतिम फेरीत पाकिस्तान आणि श्रीलंका संघ आमनेसामने येणार आहेत. त्याचवेळी या सामन्यादरम्यान पाकिस्तानी खेळाडू हसन अलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हसन अलीचा शानदार झेल व्हायरल होत आहे
खरं तर, पाकिस्तान आणि श्रीलंका सामन्यादरम्यान 17 व्या षटकात मोहम्मद हसनैनने श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाला ऑफ कटर टाकला. या चेंडूवर श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने स्लॉग शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू बॅटला लागून हवेत गेला. हा झेल पकडण्यासाठी हसन अली आणि इफ्तिखार अहमद हे दोघेही बॉलच्या खाली होते, या दरम्यान दोन्ही खेळाडूंना हे माहित नव्हते की ते एकमेकांना भिडतील, पण हसन अली नशीबवान ठरला, त्याने हा झेल घेतला. यांच्यातील आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मास्टर ब्लास्टरचा संघ मैदानात राडा घालण्यासाठी सज्ज! वाचा कधी आणि कुठे पाहता येणार विशेष सामना
ASIA CUP: पाकिस्तानला हरवण्याचे षडयंत्र रचण्यात वसीम अकरमचा हात, पाहा संपूर्ण व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---