श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचे समालोचक कुमार संगकारा (Kumar Sangakkara)याला भारत-श्रीलंका पहिल्या टी20 सामन्याच्या एक दिवस आधी म्हणजे 4 जानेवारीला हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. अंग थरथर कापत असल्याने त्यांना संध्याकाळी 8 वाजता हिंजवडी येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये नेण्यात आले जेथे त्यांच्यावर डिहायड्रेशन आणि उच्च तापावर उपचार करण्यात आले. त्यांना पहिल्या टी20 सामन्यापूर्वी डिस्चार्ज देण्यात आला.
संगकारावर उपचार करणारे डॉक्टर श्रीधर देशमुख रुबी हॉल क्लिनिकचे फिजिशियन आणि इंटेन्सिव्हिस्ट म्हणाले, ” आम्ही त्यांना दवाखान्यात भरती केले होते. त्यांना थंडी वाजून येणे, डोकेदुखी, आतड्यांमध्ये दाह आणि उच्च ताप असा त्रास असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये ते डिहायड्रेट झाल्याचे आढळून आले होते आणि 103 डिग्री सेल्सिअस ताप होता. आम्ही त्यांना दवाखान्यात दाखल करून घेतले आणि त्यांना पुन्हा हायड्रेट केले आणि इतर सहाय्यक उपचार दिले गेले. आणि ते विषाणूजन्य डिहायड्रेशन आजारातून लवकर बरे झाले.”
रुबी हॉल क्लिनिकमधील आपल्या अनुभवाविषयी बोलताना संगकारा म्हणाले, “रुग्णालयातील वास्तव्यादरम्यान माझी सर्वोतोपरी सर्वोत्तम वैद्यकीय आणि गैर-वैद्यकीय काळजी घेणाऱ्या अशा सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानू इच्छितो. याव्यतिरिक्त, मी डॉ श्रीधर देशमुख आणि त्यांच्या टीमचे आभार मानू इच्छितो जे अत्यंत सक्षम आणि अविश्वसनीय होते. प्रत्येक पैलूकडे लक्ष दिले गेले आणि मी चांगल्या हातात आहे हे जाणून मला सुरक्षित वाटले. मी रुबी हॉल क्लिनिकमधील सर्वांच्या अविस्मरणीय आठवणी घेऊन जात आहे आणि माझी प्रकृती पूर्ववत सुधारल्या बद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे.”
श्रीलंका संघ भारताच्या दौऱ्यावर असून शनिवारी (7 जानेवारी) तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटचा सामना राजकोटमध्ये खेळला जाणार आहे. या मालिकेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत आहे. यामुळे मालिका विजयासाठी शेवटचा सामनाही रोमांचक होईल. (Sri Lanka legend Kumar Sangakkara fit, successfully treated at Ruby Hall Clinic, Pune)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvSL: तिसऱ्या टी20मधून अर्शदीपचा पत्ता कट! कोणाला मिळणार संधी, पाहा भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
ब्रेकिंग! सानिया मिर्झाचा अचानक निवृत्तीचा निर्णय, ‘या’ मोठ्या स्पर्धेत खेळणार कारकिर्दीचा शेवटचा सामना