---Advertisement---

भारताविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी असा आहे श्रीलंका संघ, हा खेळाडू करणार कमबॅक

On: बुधवार, जानेवारी 1, 2020 2:41 PM
---Advertisement---

या महिन्याच्या सुरुवातीलाच श्रीलंका क्रिकेट संघ भारताचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध श्रीलंका संघात 3 सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या मालिकेला 5 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी श्रीलंका संघाची निवड करण्यात आली आहे.

श्रीलंका संघात अँजेलो मॅथ्यूजचे पुनरागमन झाले आहे. तो मागील काही दिवस दुखापतींचा सामना करत होता. पण आता तो दुखापतीतून सावरला असून भारताविरुद्ध खेळण्यास सज्ज झाला आहे.

त्याचबरोबर या श्रीलंका संघाचे नेतृत्व अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगा करणार आहे. तसेच या संघात कुसल परेरा, दनुष्का गुनथिलका, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षा, ओशडा फर्नांन्डो आणि दसुन शनका या फलंदाजांची फळी आहे.

तसेच यष्टीकक्षक म्हणून निरोशान डिक्वेल्ला आणि कुशल मेंडिस यांची निवड झाली आहे.  गोलंदाजांमध्ये मलिंगा व्यतिरिक्त वनिन्दु हसरंगा, लक्षण संदकन, धनंजय डी सिल्वा, लहिरु कुमारा आणि इसरु उडाना यांची निवड झाली आहे.

मात्र या संघात नुवान प्रदीपला दुखापतग्रस्त असल्याने निवडण्यात आलेले नाही.

भारत विरुद्ध श्रीलंका संघात पहिला टी20 सामना 5 जानेवारीला गुवाहाटी येथे होईल. त्यानंतर दुसरा सामना 7 जानेवारीला इंदोरला आणि तिसरा सामना 10 जानेवारीला पुणे येथे होणार आहे.

भारत दौऱ्यासाठी असा आहे श्रीलंकेचा संघ – लसिथ मलिंगा (कर्णधार), कुसल परेरा, दनुष्का गुनथिलका, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षा, ओशडा फर्नांन्डो, दसुन शनका, अँजेलो मॅथ्यूज, निरोशान डिक्वेल्ला, कुशल मेंडिस, वनिन्दु हसरंगा, लक्षण संदकन, धनंजय डी सिल्वा, लहिरु कुमारा, इसरू उदाना.

#श्रीलंकेचा भारत दौरा – 2020

5 जानेवारी – पहिला टी20 सामना – गुवाहाटी

7 जानेवारी – दुसरा टी20 सामना – इंदोर

10 जानेवारी – तिसरा टी20 सामना – पुणे

https://twitter.com/Maha_Sports/status/1212281203706847232

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---