Sri Lanka Squad For ODI Series : श्रीलंका विरुद्ध भारत संघातील तिसरा व शेवटचा टी20 सामना आज (30 जुलै) पल्लेकल्ले येथे खेळवला जाणार आहे. यानंतर भारतीय संघ कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली 3 सामन्यांची वनडे मालिका खेळेल. 2 ऑगस्टपासून या मालिकेची सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी यजमान श्रीलंका क्रिकेट बोर्डाने वनडे मालिकेसाठी त्यांचा 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे.
भारताविरुद्धच्या टी20 मालिकेतील नवनिर्वाचीत कर्णधार चरिथ असलंका याच्याकडे वनडे संघाच्याही नेतृत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. टी20 संघातील बऱ्याचशा खेळाडूंना वनडे संघात कायम ठेवण्यात आले आहे. तर कुसल परेरा, दसुन शनाका, रमेश मेंडिस या टी20 संघात स्थान मिळालेल्या खेळाडूंना वनडे सघातून मात्र वगळण्यात आले आहे.
दरम्यान श्रीलंका विरुद्ध भारत संघातील पहिला वनडे सामना 2 ऑगस्टला आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे पार पडणार आहे. त्यानंतर 4 ऑगस्ट व 7 ऑगस्टला अनुक्रमे दुसरा व तिसरा वनडे सामना होईल.
📢 Sri Lanka ODI squad for India Series 📢 #SLvIND pic.twitter.com/FRVzXGyOoW
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) July 30, 2024
वनडे मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ – चारिथ असलंका (कर्णधार), पथुम निसंका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, कामिंदू मेंडिस, जनिथ लियानागे, निशाण मधुष्का, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, चमिका करुणारत्ने, महिश थिक्षाना, अकिला धनंजया, दिलशान मधुशंका, मथिशा पाथीराणा, असिथा फर्नांडो
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंकेत असूनही दुरावा, भारताच्या 6 खेळाडूंचा वेगळा सराव; कोच गंभीरच्या डोक्यात नेमकं काय आहे?
आशिया चषकातील दमदार प्रदर्शनाचं बक्षीस, स्मृती मंधानाची आयसीसी टी20 क्रमवारीत भरारी
सूर्या शॉर्ट टर्म ऑप्शन…! टी20 मालिका जिंकूनही दिग्गजाने सूर्यकुमारच्या नेतृत्त्वावर उपस्थित केले प्रश्न