कोरोनामुळे इंग्लंड विरुद्धची वनडे मालिका रद्द झाल्याने दक्षिण अफ्रिका क्रिकेट बोर्ड संकटात सापडले होते. मात्र, आता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे. श्रीलंका संघ २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण अफ्रिकेचा दौरा करणार आहे.
दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील ही कसोटी मालिका कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असणार आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने म्हटले की, “क्रिकेट दक्षिण आफ्रिका आणि क्रिकेट श्रीलंका संयुक्तरीत्या याची पुष्टी करत आहे की, निश्चित वेळापत्रकानुसार दोन सामन्यांच्या कसोटी मालिका २६ डिसेंबरपासून होईल. ही मालिका सेंच्युरियन आणि जोहान्सबर्ग येथे खेळली जाईल. ही कसोटी मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशीपचा भाग आहे.”
https://twitter.com/OfficialCSA/status/1337029870287806466
बॉक्सिंग डे कसोटीने होणार सुरुवात
या दौऱ्याची सुरुवात २६ डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याने होणार आहे. तसेच दुसरा व अंतिम कसोटी सामना ३ ते ७ जानेवारी दरम्यान जोहान्सबर्गमध्ये होणार आहे.
दोन्ही संघासाठी ही मालिका महत्त्वाची असणार आहे. श्रीलंका ८० गुणांसह कसोटी चॅम्पियनशीपमध्ये ६व्या स्थानी आहे, तर दक्षिण अफ्रिका २४ गुणांसह ८ व्या स्थानी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकात ‘या’ खेळाडूने करावे भारतीय संघाचे नेतृत्त्व; पार्थिव पटेलने मांडले मत
ट्रेंडिंग लेख-
शंभर शतके ठोकणाऱ्या सचिनला आवडतात स्वतःच्या ‘या’ तीन खेळ्या; दुसरी आहे खूपच खास
शाहरुख खानच्या ५ क्रिकेटवरील जाहिराती, ज्यांनी एकवेळी घातला होता धुमाकूळ
अठरा वर्षांची ‘छोटीशी’ क्रिकेट कारकीर्द खेळलेला ‘पार्थिव पटेल’






