---Advertisement---

इंग्लंडमध्ये श्रीलंकेच्या ड्रेसिंग रूममध्ये आग! जिवाच्या आकांताने बाहेर पडले खेळाडू, नेमकं काय घडलं?

On: मंगळवार, ऑगस्ट 20, 2024 10:25 PM
Sri Lanka
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाला वनडे मालिकेत पराभवाचे पाणी पाजल्यानंतर श्रीलंकेचा संघ आता इंग्लड दौऱ्यावर आहे. उभय संघात बुधवार (21 ऑगस्ट) पासून ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियम, मँचेस्टर येथे 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. मात्र इंग्लंड विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच ही मालिका चर्चेत आली आहे. पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी सराव सत्रादरम्यान एक विचित्र घटना घडली आहे. ड्रेसिंग रूममध्ये फायर अलार्म वाजल्याने श्रीलंकेचा संघ घाईघाईत ड्रेसिंग रूममधून बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, श्रीलंकेच्या ड्रेसिंग रूममध्ये अचानक फायर अलार्म वाजल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले. ड्रेसिंग रूम किंवा आसपास आग लागल्यावर फायर अलार्म वाजतो. मात्र सुदैवाने श्रीलंकन ​​संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये आग लागल्याची बातमी खोटी ठरली. 15 मिनिटांनी सर्व खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये परतले. मात्र फायर अलार्म वाजल्याने ड्रेसिंग रूममध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

श्रीलंकेकडे कसोटी मालिका विजयाची सुवर्णसंधी 
बेन स्टोक्स आणि जॅक क्रॉली श्रीलंकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळणार नाहीत. अशा परिस्थितीत, पाहुण्या संघाला 2014 नंतर इंग्लंडमध्ये दुसऱ्यांदा कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे. 2014 मध्ये, श्रीलंकेने कसोटी मालिकेत इंग्लंड संघाचा 1-0 ने पराभव केला होता. सध्या धनंजय डी सिल्वाच्या नेतृत्वाखाली हा आशियाई संघ खूप चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे.

21 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी श्रीलंकेने इंग्लंड लायन्स विरुद्ध 4 दिवसांचा सराव सामना खेळला होता, ज्यामध्ये श्रीलंकेला 7 विकेट्सने दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्या पराभवाचे कारण स्पष्ट करताना कॅप्टन डी सिल्वाने सांगितले होते की, इंग्लंडमधील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी श्रीलंकेच्या संघाला आणखी एका सराव सामन्याची गरज आहे, परंतु त्यांची मागणी फेटाळण्यात आली. आता 21 ऑगस्टपासून दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिका सुरू होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘इशान किशनला टीम इंडियात जागा नाही’, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरचं वादग्रस्त विधान

विनेश फोगटची नवी इनिंग! कुस्ती सोडल्यानंतर आता राजकारणाच्या आखाड्यात उतरणार?

दिग्गज क्रिकेटर विराट कोहलीसोबत फोटो घेण्यासाठी खूप इच्छुक ‘ही’ महिला खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---