भारताची अनुभवी महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिने पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या फायनलपूर्वी अतिरिक्त वजनामुळे अपात्र ठरल्यानंतर, निवृत्तीची घोषणा केली होती. तिचे मायदेशी परतल्यानंतर जंगी स्वागत करण्यात आले. हा तब्बल 13 तासांचा रोड शो होता. ज्यामध्ये हजारो चाहत्यांनी उपस्थिती लावली होती. हरियाणाचे प्रमुख काँग्रेस नेते दीपेंद्र हुड्डाही विनेशच्या स्वागतासाठी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले होते. त्यामुळे विनेशच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या बातम्यांना उधाण आले आहे.
जवळच्या सूत्रांनी सांगितले आहे की, कुस्तीपटू विनेश फोगट हरियाणा विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. विनेशने यापूर्वी ती सक्रिय राजकारणात येणार नसल्याचे सांगितले असले तरी, काही राजकीय पक्ष तिचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. विनेशची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या फ्रीस्टाइल 50 किलो गटात सुवर्णपदक जिंकण्याची संधी हुकली. कारण, तिला 100 ग्रॅम जास्त वजनामुळे अंतिम फेरीतून अपात्र ठरवण्यात आले होते.
विनेशचे दिल्लीत आणि सोनीपतमधील बलाली गावात जोरदार स्वागत करण्यात आले. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर काँग्रेस खासदार दीपेंद्र हुडा आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी विनेश व इतर कुस्तीपटूंचे स्वागत केले होते. अद्याप, विनेश कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप निश्चित झालेले नाही.
हरियाणा विधानसभेत विनेश फोगट आपली चुलत बहीण व भाजप नेता बबिता फोगट हिच्याविरुद्ध निवडणूक लढवू शकते. तसेच, 2020 टोकियो ऑलिंपिक्समध्ये कांस्यपदक पटकावणारा कुस्तीपटू बजरंग पुनिया हा 2012 चा लंडन ऑलिंपिक्स पदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त याच्याविरुद्ध लढू शकतो.
विनेश व बजरंग कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्याविरुद्धच्या आंदोलनात अग्रस्थानी होते. थेट सरकारविरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांच्यावर अनेकदा टीका करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर त्यांना देशभरातून मोठा पाठिंबा देखील मिळाला.
महत्त्वाच्या बातम्या-
VIDEO: ‘काला चष्मा’ गाण्यावर 2 ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या मनू भाकरचा भन्नाट डान्स
“असं वाटतं एकावेळी दोन सामने…” पाकिस्तानच्या स्टार गोलंदाजानं दिली भावनिक प्रतिक्रिया
दिग्गज क्रिकेटर विराट कोहलीसोबत फोटो घेण्यासाठी खूप इच्छुक ‘ही’ महिला खेळाडू