आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने(आयसीसी) श्रीलंका संघाला या विश्वचषकातील त्यांच्या उर्वरित सामन्यांसाठी प्रामुख्याने पिवळा रंग असलेली जर्सी घालण्याची परवानगी दिली आहे.
श्रीलंका संघ त्यांच्यासाठी ही जर्सी भाग्यशाली असल्याचे मानत आहे. श्रीलंकेने ही जर्सी इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात घातली होती. तसेच यजमान इंग्लंडला त्यांनी पराभवाचा धक्का देत या विश्वचषकातील आव्हानही कायम ठेवले होते.
या विश्वचषकात श्रीलंकेची गडद निळ्या रंगाची जर्सी ही प्रमुख जर्सी होती. तसेच ते पिवळ्या रंगाची जर्सी ही दुसरी जर्सी होती. ही जर्सी ते या विश्वचषकात निळ्या रंगाची जर्सी असणाऱ्या प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध घालणार होते. पण आता त्यांना ही पिवळ्या रंगाची जर्सी उर्वरित स्पर्धेसाठी घालण्याची परवानगी मिळाली आहे.
याबद्दल आयसीसीच्या प्रवक्त्यांनी एएफपीला सांगितले की ‘उर्वरित स्पर्धेसाठी श्रीलंकेने पिवळी जर्सी घालण्याची विंनती आम्ही मान्य केली आहे.’
यानुसार 2019 विश्वचषकात आज(28 जून) दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका संघात सुरु असलेल्या सामन्यात श्रीलंकेचे खेळाडू पिवळी जर्सी घालून मैदानात उतरले आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विंडीज विरुद्धच्या विजयानंतरही सेहवागने केली भारतीय फलंदाजांवर टीका, जाणून घ्या कारण
–विजयाच्या आनंदात कर्णधार कोहलीने घेतली चाहत्यांबरोबर सेल्फी, पहा व्हिडिओ
–कॉट्रेल बाद होताच शमी-विराटने केले त्याच्याच सॅल्यूट स्टाईलने सेलिब्रेशन,पहा व्हिडिओ






