भारताच्या श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाचा खेळाडू कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. या प्रकरणात श्रीलंका दौऱ्यावर गेलेले बीसीसीआयचे वैद्यकीय अधिकाऱ्यावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. या अधिकाऱ्याने आरटीपीसीआर चाचणीला एक दिवसाचा उशीर केला, ज्यामुळे ८ खेळाडू २ टी-२० सामने खेळू शकले नाहीत, अशी चर्चा सध्या होत आहे.
पीटीआयच्या माहितीनुसार २६ जुलैला जेव्हा कृणालला घशात त्रास होऊ लागला, त्यानंतर त्याने लगेच दौऱ्यावरील बीसीसीआयच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला याची माहिती दिली. मात्र, त्यानंतर त्याची रॅपिड ऍंटीजन टेस्टही झाली नाही आणि त्याला विलगीकरणातही ठेवले गेले नाही.
घशात त्रास होत असतानाही वैद्यकीय अधिकाऱ्याने कृणालला संघाच्या मिटिंगमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली. त्यानंतर २७ जुलैच्या सकाळी त्याची कोरोना चाचणी केली गेली. चाचणीचा अहवाल दुपारी आला, ज्यानंतर बीसीसीआय आणि श्रीलंका क्रिकट बोर्डाने सामना एक दिवसासाठी स्थगित केला. कृणालच्या संपर्कात आलेल्या ८ खेळाडूंचीही चाचणी करण्यात आली. सुरुवातीला सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. मात्र, श्रीलंका दौऱ्यावरून परतण्याच्या आधी कृष्णप्पा गौतम आणि युझवेंद्र चहल हे दोघे पाॅझिटिव्ह आढळले.
पीटीआयला सुत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, “२६ जुलैला कृणालच्या घशात त्रास झाला आणि त्याने नियमाप्रमाणे संघाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला याची माहिती दिली होती. रॅपिड ऍंटीजन चाचणीनंतर त्याला लगेच विलगीकरणात ठेवले गेले पाहीजे होते. मात्र, तसे काहीच झाले नाही. रॅपिड ऍंटीजन चाचणीनंतर कोरोनाची लागण झालेली समजेलच असे नाही, मात्र हा नियमाचा पहिला भाग आहे. मी याचीही खात्री देऊ शकतो की कृणालला घाशात त्रासा होत असतानाही तो संघाच्या मीटींगमध्ये सहभागी झाला होता.”
भारताच्या श्रीलंका दौऱ्यात भासतीय संघने ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळले होते. दौऱ्यावर भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी शिखर धवनवर होती. एकदिवसीय मालिकेत संघाने २-१ असा विजय मिळवला, तर टी-२० मालिकेत संघाला १-२ अशी हार पत्करावी लागली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
…म्हणून इशान किशनला रोहित शर्मा म्हणाला, ‘कोणी काही बोलले तर त्याला माझ्याशी बोलायला सांग’
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना अकमलची इंग्रजी पाहून तुम्हीही खदखदून हसाल; चाहते म्हणाले…
शतकांच्या शतकाचं इंजिन आज जोडलं गेलं होतं, याचदिवशी सचिनने केलं होतं पहिलं आंतरराष्ट्रीय शतक