---Advertisement---

संजू सॅमसनच्या पदार्पणाची चर्चा असूनही इशान किशनला का मिळाली संधी? कारण आले पुढे

On: रविवार, जुलै 18, 2021 4:49 PM
---Advertisement---

कोलंबो| रविवार रोजी (१८ जुलै) श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यात आर प्रेमदासा स्टेडियमवर पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यातून यजमान श्रीलंकाकडून भानुका राजपक्ष आणि पाहुण्या भारताकडून सूर्यकुमार यादव व इशान किशन यांनी वनडे पदार्पण केले आहे. २३ वर्षीय इशानला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात जागा देण्यात आली आहे. परंतु या सामन्यापुर्वी यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याला अंतिम ११ जणांमध्ये जागा मिळणार असल्याची चर्चा होती.

मात्र सॅमसनला बाकावर बसवत इशानच्या हाती ग्लोव्ह्ज देण्यात आल्याने सर्वांना आश्चर्य वाटले. बीसीसीआयने नुकतेच या यष्टीरक्षक फलंदाजाला न निवडण्यामागचे कारण सांगितले आहे.

बीसीसीआयने माहिती दिली आहे की, ‘भारताचा प्रमुख यष्टिरक्षक फलंदाज सॅमसन याच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे पहिल्या वनडेसाठी त्याच्या नावाचा विचार केला गेला नाही. परिणामी दुसरा यष्टीरक्षक फलंदाज इशानला त्याच्या २३ व्या वाढदिवशी वनडे पदार्पणाची संधी मिळाली आहे. भारतीय संघाची मेडिकल टीम सॅमसनच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे. परंतु त्याची जास्त गंभीर आहे की नाही, हे अद्याप अस्पष्ट आहे.’

दुर्दैवाची बाब अशी की, फलंदाजी आणि यष्टीरक्षणात उत्कृष्ट कामगिरी करण्याची क्षमता असूनही एमएस धोनी, त्यानंतर रिषभ पंत किंवा वृद्धिमान साहा यांच्यामुळे सॅमसनला जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळायला मिळाले नाहीत. त्याने २०१५ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध हरारे कसोटीतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. पण तो आतापर्यंत फक्त ७ टी२० सामने खेळू शकला आहे. या ७ सामन्यांमध्ये २३ धावांच्या सर्वोच्च वैयक्तिक खेळीसह त्याने ८३ धावांची कामगिरी केली आहे.

दुसरीकडे इशानने टी२० पदार्पणाच्या अवघ्या ६ महिन्यांच्या आतच वनडे क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले आहे. मार्च २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध त्याने टी२० सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शुभारंभ केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

SL vs IND 1st ODI Live: कुलदीपच्या फिरकीची जादू चालली, एकाच षटकात घेतल्या २ विकेट्स; श्रीलंकेच्या १०० धावा पार

लहान वयातच अनेकांसाठी आदर्श ठरलेली ‘सांगलीकर’ स्म्रीती मंधना

ज्या वयात खेळाडू रिटायर होतात, त्या वयात शिखर धवनने कर्णधार व्हायचा विक्रम केलाय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---