भारतात सुरू असलेल्या वनडे विश्वचषक चांगलाच रंगात आला आहे. शुक्रवारी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील रोमांचक सामना चाहत्यांना पाहायला मिळाला. शनिवारी (21 ऑक्टोबर) नेदर्लंड्स आणि श्रीलंका संघांमध्ये आमना सामना होणार आहे. शनिवारी होणाऱ्या दोन सामन्यांपैकी हा पहिला सामना असेल.
लखनऊच्या अटल बिहारी वाजपेई स्टेडियमवर हा सामना आयोजित केला गेला आहे. आयसीसी विश्वचषकाच्या वेळापत्रकात शनिवारी दोन सामने आयोजित केले गेल्यामुळे हा सामना सकाळी 10.30 वाजता सुरू होईल. नेदर्लंड्स संघ विश्वचषक स्पर्धेत नवखा आहे. मात्र, श्रीलंकन संघाकडे विश्वचषक खेळण्याचा मोठा अनुभव असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. असे असले, तरी चालू विश्वचषक हंगामात श्रीलंकेच्या तुलनेत नेदर्लंड्स संघाचे पारडे जड ठरू शकते.
विश्वचषक 2023 मध्ये श्रीलंकेने आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांपैकी एकही सामना त्यांना जिंकता आला नाही. गुणतालिकेत देखील श्रीलंकन संघ सर्वात शेवटी आहे. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका, दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान आणि तिसऱ्या सामन्यात श्रीलंका संघाकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे नेदर्लंड्स संघाचे चालू विश्वचषक स्पर्धेतील प्रदर्शन पाहिले, तर संघ कडवे आव्हान देत आहे. नेदर्लंड्सने आपला शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 38 धावांनी जिंकला. आफ्रिकी संघाला नेदर्लंड्सने अवघ्या 207 धावांवर गुंडाळले आणि विश्वचषकात पहिला विजय मिळवला. त्याआधी पहिल्या दोन सामन्यांमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून त्यांना पराभव मिळाला होता.
Back in action tomorrow, this time against a familiar opponent. ????????????#CWC23 pic.twitter.com/B66r9qS8gO
— Cricket????Netherlands (@KNCBcricket) October 20, 2023
हेड-टू-हेड रेकॉर्ड –
विश्वचषकात हे दोन संघ अद्याप एकदाही आमने सामने आले नाहीत. मात्र, एकंदरीत विचार केला तर श्रीलंका आणि नेदर्लंड्स संघ आतापर्यंत पाच वनडे सामन्यांमध्ये एकमेकांसमोर आले आहेत. यातील पाचही सामने श्रीलंकेने जिंकले आहेत. यावेळी मात्र नेदर्लंड्स संघ पूर्वीपेक्षा अधिक भक्कम दिसत आहे. संघ पूर्ण रणनीतीसह खेळताना दिसत असून श्रीलंकेला सावध भूमिका घ्यावी लागू शकते. कारण वनडे क्रिकेटमध्ये श्रीलंकेकडून मिळालेल्या पाचही पराभवांचा बदला नेदर्लंड्स विश्वचषकात घेण्याच्या तयारीत असणार, यात शंका नाही.
पिच रिपोर्ट –
इकाना स्टेडियमवर आतापर्यंत एकूण 6 वनडे सामने खेळले आहेत, त्यापैकी तीन सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने, तर तीन सामने प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघआने जिंकले आहेत. याठिकाणी खेळपट्टी फलंदाजीसाठी फायद्याची आहे. पण सोबतच वेगवान गोलंदाज देखील कमाल दाखवू शकतात. सुरुवातीच्या षटकांमध्ये फलंदाजांसाठी स्विंग होणारा वेगवान चेंडू घातक ठरू शकतो.
सामन्याचे थेट प्रक्षेपण –
भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना दुपारी 2 वाजता सुरू होईल. सामन्याच्या नाणेफेकीची वेळ 1.30 वाजता आहे. हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सवर पाहता येईल. तसेच, डिझ्नी प्लस हॉटस्टार ऍपवर या सिनेमाची लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल. (Sri Lanka vs Netherlands match preview)
यातून निवडली जाणार प्लेइंग इलेव्हन –
पाकिस्तान संघ: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम.
नेदरलँड्स संघ: स्कॉट एडवर्ड्स (क), मॅक्स ओ’डॉड, बास डी लीडे, विक्रम सिंग, तेजा निदामानुरु, पॉल व्हॅन मीकरेन, कॉलिन अकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लेन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद, सायब्रँड एंजेलब्रेक्ट.
महत्वाच्या बातम्या –
तिशीत पदार्पण करून क्रिकेटविश्व जावणारे तीन दिग्गज क्रिकेटपटू, वाचा सविस्तर
विश्वचकाच्या 20व्या सामन्यात इंग्लंड-दक्षिण आफ्रिका भिडणार, जाणून घ्या खास आकडेवारी आणि पिच रिपोर्ट