कोलंबो | सिंहली स्पोर्ट्स क्लबच्या क्रिकेट मैदानावर शुक्रवारी (20 जुलै) श्रीलंका-दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे.
या सामन्यात श्रीलंकेचा माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने कसोटी कारकिर्दित मोठा टप्पा गाठला आहे.
अँजेलो मॅथ्यूजने कसोटी क्रिकेट कारकिर्दीत 5000 धावांचा टप्पा पार केला आहे.
अँजेलो मॅथ्यूजने 2009 साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याने 75 कसोटी सामन्यात 8 शतके आणि 28 अर्धशतकांच्या मदतीने या पाच हजार धावा केल्या आहेत.
यापूर्वी श्रीलंकेच्या 9 फलंदाजांना कसोटी क्रिकेटमध्ये पाच हजार धावांचा टप्पा पार करता आला आहे.यामध्ये कुमार संगाकारा, महेला जयवर्धने, सनथ जयसूर्या, अरविंद डी सिल्वा, मार्वन अट्टापट्टू, तिलकरत्ने दिलशान, थिलन समरवीरा आणि अर्जुन राणातुंगा यांचा समावेश आहे.
तर श्रीलंकेसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 12,400 धावा करण्याचा विक्रम कुमार संगाकाराच्या नावे आहे.
या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेने 86 षटकात 9 बाद 277 धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
-वनडेत द्विशतक करणारा हा ठरला पहिलाच पाकिस्तानी फलंदाज
-पाकिस्तानी सलामीवीरांची विश्वविक्रमी भागीदारी, 18 वर्षापूर्वीचा विक्रम मोडला