---Advertisement---

सलाम! ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून उत्पन्न होणारा निधी करणार दान, श्रीलंका क्रिकेट बोर्डाचा स्वगतार्ह निर्णय

On: बुधवार, जून 8, 2022 4:20 PM
Aus-Vs-Sl
---Advertisement---

सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ३ टी२० आणि ५ एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहे. मात्र, या सामन्यांतून उत्पन्न होणारा सर्व निधी दान करणार असल्याची घोषणा श्रीलंका क्रिकेट बोर्डाने घेतला आहे.. श्रीलंक क्रिकेट बोर्डाचे सचिव मोहन डि सिल्वा यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. 

श्रीलंकेचे क्रीडा मंत्री रोशन रणसिंगे यांनी केलेल्या आवाहनानंतर क्रिकेट बोर्डाच्या कार्यकारी समितीने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत माहिती देताना डी सिल्वा म्हणाले की, “ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे स्वागत करताना मला अभिमानाने सांगावेसे वाटते की हा दौरा आपल्या देशासाठी केवळ क्रिकेटच्या आघाडीवरच नाही, तर या काळात झालेल्या परकीय चलनाच्या महसुलामुळे आर्थिक आघाडीवरही महत्त्वाचा आहे. श्रीलंका क्रिकटने निर्णय घेतला आहे की या मालिकेतून उत्पन्न होणारा निधीची संपूर्ण रक्कम लोकांच्या फायद्यासाठी दान करण्यात येईल.”

एकुण ५२ दिवसांच्या या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून श्रीलंका क्रिकेटला एकुण २५ लाख डॉलर मिळण्याची शक्यता आहे. हा सर्व निधी श्रीलंकेवर आलेल्या आर्थिक संकटातून देशाला बाहेर काढण्यासाटी नदतीचा ठरू शकत असल्येचेही क्रिकेट बोर्डाचे सचिव डी सिल्वा यांनी सांगितले आहे.

दरम्यान, या मालिकेतील पहिला टी२० सामना ७ जून रोजी खेळला गेला. या सामन्यांत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावाअखेरीस श्रीलंका १९.३ षटकांत १२८ धावांवर सर्वबाद झाले. त्यावेळी दुसऱ्यांदा फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला १२९ धावांचे आवाहन होते. यावेळी ऑस्ट्रेलियाने१४ षटकांत बिनबाद १३४ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया संघाच्या विजयाचे हिरो होते वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड (Josh Hazelwood), सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि कर्णधार ऍरोन फिंच (Aaron Finch). हेझलवूडने गोलंदाजीत कमाल केली. त्याने चार षटकात १६ धावा देत ४ बळी घेतले. त्याचवेळी वॉर्नरने नाबाद ७० आणि फिंचने नाबाद ६१ धावा केल्या. वॉर्नरने ४४ चेंडूंच्या खेळीत ९ चौकार लगावले. तर, फिंचने ४० चेंडूंच्या खेळीत ४ चौकार आणि ४ षटकार लगावले.

व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

Mithali Raj Retirement। मितालीबद्दल माहीत नसलेल्या ‘या’ खास गोष्टी घ्या जाणून

शिवम मावीच्या चेंडूवर मयांक अग्रवाल झाला दुखापतग्रस्त, व्हिडिओ होतोय व्हायरल

बाबो! बंगालच्या ९ फलंदाजांनी केल्या ५० धावा पार अन् मोडला चक्क १२९ वर्षांचा विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---