---Advertisement---

फायनल गाठूनही पाच वेळा स्वप्नभंग, अखेर 20 वर्षांनंतर पहिल्यांदाच श्रीलंकेने उंचावला आशिया चषक

On: रविवार, जुलै 28, 2024 8:15 PM
Sri Lanka Women
---Advertisement---

Women Asia Cup : महिला आशिया चषक 2024 च्या (Women Asia Cup Final) अंतिम सामन्यामध्ये श्रीलंकेने भारताचा 8 गडी राखून (India vs Sri Lanka) पराभूत केले. यासह भारत आठव्यांदा आशिया चषक विजेता बनण्यापासून परावृत्त राहिला. त्याचबरोबर श्रीलंका संघाने पहिल्यांदाच ही स्पर्धा आपल्या नावे केली. वीस वर्षानंतर प्रथमच श्रीलंका महिला संघाने आशिया चषक जिंकण्याचा कारनामा केला.

यंदा मायदेशातच आयोजित केल्या गेलेल्या या स्पर्धेत श्रीलंका संघाला विजेतेपदाचे दावेदार मानले जात होते. मात्र, भारतीय संघाने साखळी फेरी व त्यानंतर उपांत्य फेरीत मोठे विजय साजरे करत, अंतिम फेरीत पाऊल ठेवलेले. परंतु, श्रीलंका संघाने भारतीय संघाचे मनसुबे उधळून लावत विजेतेपद आपल्या नावे केले.

श्रीलंका 2004 मध्ये झालेल्या पहिल्या महिला आशिया चषकात उपविजेता ठरलेला. त्यानंतर 2005, 2006 व 2008 यापुढील तीन स्पर्धांमध्ये देखील त्यांनी उपविजेतेपदच पटकावले. त्यानंतर 2012 मध्ये उपांत्य फेरीपर्यंत त्यांनी मजल मारली. संघाला 2016 मध्ये तिसऱ्या व 2018 मध्ये चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तर, 2022 मध्ये झालेल्या स्पर्धेत ते उपविजेते होते.

महिला आशिया चषक स्पर्धेत आतापर्यंत भारताने सात वेळा विजेतेपद पटकावले आहे. तर, बांगलादेश व श्रीलंका यांनी प्रत्येकी एक वेळा ही कामगिरी केली. पाकिस्तान संघाला मात्र अद्याप एकदाही ही स्पर्धा जिंकता आलेली नाही.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 6 गडी गमावून 165 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, श्रीलंकेच्या संघाने 8 चेंडू बाकी असताना, 8 गडी राखून विजय मिळवला. श्रीलंकेचे हे आशिया चषक स्पर्धेचे पहिलंच विजेतेपद आहे. श्रीलंकेसाठी कर्णधार चमारी अटापट्टू आणि हर्षिता समरविक्रमा यांनी अर्धशतकी खेळी केल्या. अटापट्टू हिला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळाला.

हेही वाचा – 

टीम इंडियाचा हार्टब्रेक! आशिया चषकाच्या फायनलमध्ये श्रीलंकेकडून पराभव
श्रीलंकेसाठी दोन्ही हातांनी गोलंदाजी करणारा कामिंदू मेंडिस पहिलाच गोलंदाज नव्हे; 28 वर्षांपूर्वीही झालंय असं
IND vs SL : ओल्या मैदानामुळे भारत विरुद्ध श्रीलंका संघातील दुसऱ्या टी20 सामन्याच्या नाणेफेकीला उशीर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---