श्रीलंकेने नव्या वर्षाची सुरुवात दणदणीत विजयाने केली आहे. श्रीलंकेचा हा विजय इतका मोठा आहे की, 17 वर्षांपासून सुरू असलेला विजयाचा दुष्काळ संपला आहे. यावरून हा विजय श्रीलंकेसाठी किती अर्थपूर्ण आहे. याचा अंदाज लावला जाऊ शकतो. लंकेच्या या ऐतिहासिक विजयात कुसल परेराचे महत्त्वपूर्ण योगदान होते. ज्याने आपल्या टी20 कारकिर्दीतील पहिले शतक झळकावून मोठा पराक्रम केला.
सॅक्सटन ओव्हल, नेल्सन येथे खेळल्या गेलेल्या या तिसऱ्या टी20 सामन्यात श्रीलंकेने 7 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. मात्र, यजमान न्यूझीलंडने 3 सामन्यांची टी20 मालिका 2-1 अशी जिंकण्यात यश मिळवले. न्यूझीलंडने 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले. 2006 मध्ये श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात पहिल्यांदा टी20 मालिका खेळली गेली होती. ही 2 सामन्यांची मालिका न्यूझीलंडच्या भूमीवर आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर 22 डिसेंबर 2006 रोजी पहिला सामना श्रीलंकेने डकवर्थ लुईस नियमाचा वापर करून जिंकला तर दुसरा सामना न्यूझीलंडने जिंकला.
या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 5 गडी गमावून 218 धावांची मोठी धावसंख्या उभारली. कुसल परेराने अवघ्या 46 चेंडूंत 13 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 101 धावांची तुफानी खेळी केली. कर्णधार चारिथ असलंकाने 46 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून केवळ 211 धावा करू शकला. न्यूझीलंडकडून रचिन रवींद्रने सर्वाधिक ६९ धावा केल्या.
न्यूझीलंडने यापूर्वी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये श्रीलंकेचा दौरा केला होता. त्या दौऱ्यावर 2 सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली जी 1-1 अशी बरोबरीत राहिली. पहिला सामना श्रीलंकेने 4 गडी राखून जिंकला तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने 5 धावांनी विजय मिळवला. आता न्यूझीलंडने घरच्या मैदानावर टी20 मालिका जिंकून श्रीलंकेविरुद्ध क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये आपली विजयी मालिका कायम ठेवली आहे.
हेही वाचा-
रोहित शर्माला सिडनी कसोटीतून वगळणार? गौतम गंभीरच्या या उत्तराने सगळेच थक्क
भारतीय संघाचे 2025 मधील टी20 सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक, पाहा एका क्लिकवर
IND vs AUS: भारत मालिका गमावणार! सिडनीमध्ये टीम इंडियाची आश्चर्यकारक आकडेवारी