क्रिकेटला जेंटलमन गेम म्हणून ओळखले जाते. मात्र, सर्वच क्रिकेटर जेंटलमन नसतात. काहींच्या चारित्र्यावर शिंतोडे देखील उडले आहेत. नुकतेच, ऑस्ट्रेलियामध्ये टी20 विश्वचषक खेळण्यासाठी गेलेल्या श्रीलंकेच्या दनुष्का गुणाथिलका याला एका लैंगिक अत्या’चाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.
लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली श्रीलंकेचा क्रिकेटपटू दनुष्का गुनाथिलका अटकेत
श्रीलंकेचा फलंदाज दनुष्का गुनाथिलका (Danushka Gunathilaka) याला सिडनी येथून अटक करण्यात आली आहे. टी20 विश्वचषक खेळण्यासाठी गेलेल्या गुनाथिलका याला संघाच्या हॉटेलमधून अटक करण्यात आली. त्याच्यावर या आठवड्याच्या सुरुवातीला एका 29 वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.
"Sri Lanka Cricket confirms that it was notified
by the ICC that player Danushka Gunathilaka
has been arrested on the allegations of
sexual assault of a woman in Sydney, and Mr.
Gunathilaka is due to appear in court tomorrow
(7 November 2022) " the statement said.#T20WC2022— Asia Jamshed (@asia_jamshed) November 6, 2022
एक दोन नाही, तर तब्बल 9 सेक्स सेक्स स्कॅंडलमध्ये शेन वॉर्न
दनुष्का गुनाथिलका याच्या आधी देखील बऱ्याच क्रिकेटपटूंवर लैंगिक शोषणाचे आरोप लागले आहेत. काहींनी तर कबूली देखील दिलीये की, त्यांच्या हातून हा गुन्हा घडला आहे. या सर्वांमध्ये एक नाव शेन वॉर्न याचे देखील आहे. वॉर्नला 2000 मध्ये एका ब्रिटीश नर्सला अश्लील संदेश आणि कॉल्स करताना पकडले गेलेले, तेव्हा त्याला यामुळे ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधारपद गमवावे लागले होते. 2003 मध्ये देखील त्याचे नाव एका सेक्स स्कॅंडलमध्ये आलेले. त्यानंतर वॉर्न 2006 मध्ये एका व्हिडिओमध्ये दोन ब्रिटीश महिलांसोबत दिसला होता. वॉर्नचे नाव एकूण 9 सेक्स स्कॅंडलमध्ये आलेले. यातल्या काहींचा उल्लेख त्याने त्याच्या आत्मकथेत देखील केला.
शाहिद आफ्रिदी
पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी देखील या यादीत सामील आहे. 2000 मध्ये आफ्रिदी आणि काही अन्य क्रिकेटर्सला हॉटेलच्या एका खोलीत काही मुलींसोबत पकडण्यात आलेले होते. यावर त्यांनी म्हटले की, या सर्व मुली त्यांच्या चाहत्या असून ऑटोग्राफ घेण्यासाठी खोलीत आलेल्या. मात्र, पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाला यावर विश्वास बसला नाही. त्यानंतर या सर्वांना केनियामध्ये होणाऱ्या चॅंम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला.
केविन पीटरसन
इंग्लंडचा दिग्गज खेळाडू केविन पीटरसन देखील बऱ्याच विवादांमध्ये अडकलेला. त्याचे बिग ब्रदर फेम प्लेबॉय मॉडल वेनेसा निम्मो सोबत प्रेमचर्चांना उधान आलेले. पीटरसनने एका एसएमएसच्या माध्यमातून तिच्याशी ब्रेकअप केलेले. त्यानंतर निम्मोने पीटरसनवर खूप गंभीर आरोप लावले होते. निम्मोने म्हटले होते की, “केविन संभोगासाठी उतावळा होता आणि दिवसभर माझ्यामागे लागलेला असायचा. त्याचा परफॉर्मंन्स अजिबात चांगला नव्हता, त्याने कधीच माझ्यासोबत छक्के नाही मारले.”
ख्रिस गेल
टी20 क्रिकेटचा बादशाह समजल्या जाणाऱ्या ख्रिस गेल (Chris Gayle) याला एकदा श्रीलंकेतील एका हॉटेलमध्ये तीन ब्रिटीश महिलांसोबत पकडण्यात आलेले. दुसरा किस्सा बिग बॅश लीग दरम्यानचा आहे, जेव्हा ख्रिसने एका महिला टीव्ही प्रेझेंटरला ‘बेबी’ म्हणत ड्रिंक्ससाठी विचारणा केलेली. त्याच्यावर 2015 च्या विश्वचषकादरम्यान एका महिला स्टाफने प्रायव्हेट पार्ट दाखवण्याचा आरोप लावलेला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानात माजी पंतप्रधानांच्या सुरक्षेचे वांदे, आशिया चषकासाठी भारतीय संघाला न पाठवण्याची होतेय मागणी
सूर्यकुमार यादवची प्रशंसा करताना रोहितने ओलांडली मर्यादा; म्हणाला, ‘त्याच्यामुळेच इतर खेळाडू…’