श्रीलंकेत सध्या मोठे आर्थिक आणि राजकीय संकट उभे राहिले आहे. यावर्षी २७ ऑगस्टपासून श्रीलंकेन संघाला आशिया चषकाचे जयमानपद भूषवायचे आहे. पण आर्थिक संकटामुळे हे शक्य होईल की नाही ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. परिस्थिती एवढी बिकट झाली आहे की, श्रीलंकेचा क्रिकेटपटू चमिका करुणारत्नेला सरावासाठी जाता येत नाहीये.
आर्थिक संकटामुळे श्रीलंकेत इंधनाचीही टंचाई निर्माण झाली आहे. याच कारणास्तव खेळाडूं सराव करण्यासाठी मैदानापर्यंतही पोहोचू शकत नाहीत. चमिका करुणारत्ने (Chamika Karunaratne) याने इंधन टंचाईची ही अडचण बोलून दाखवली आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना तो म्हणाला की, “दोन दिवस मोठ्या रांगेत उभा राहिल्यानंतर त्याला पेट्रोल मिळाले आहे.” परिस्थिती जर अशीच राहिली, तर आगामी काळात खेळवला जाणारा आशिया चषक श्रीलंकेऐवजी दुसरीकडे हलवला जाऊ शकतो.
आशिया चषकाविषयी करुणारत्नेची प्रतिक्रिया –
आशिया चषका आणि आगामी काळातील लंका प्रीमियर लीगविषयी देखील करुणारत्नेने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “आशिया चषकाचे आयोजन केले जाणार आहे. मला माहिती नाहीये की, पुढे काय होईल. मला सरावासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जायचे होते, पण इंधन मिळात नसल्यामुळे जाता येत नाहीये. मात्र, आम्ही आशिया चषकासाठी तयार आहोत आणि मला वाटते की, या मोठ्या आयोजनासाठी देश पुरेसे इंधन उपलब्ध करून देईल.”
श्रीलंकन संघाचा माजी दिग्गज सनथ जयसूर्या त्यांच्या सरकारविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होत आहे. काही दिवसांपूर्वी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जयसूर्याने मुलाखत दिली होती. मुलाखतीत तो म्हटलेला की, कोणत्याही किमतीत क्रिकेट थांबू देणार नाही. जयसूर्याने ऑस्ट्रेलिया संघ आणि प्रशासनाचे आभार मानले होते.
श्रीलंका संघाने नुकतीच काही दिवासंपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळली. श्रीलंकेत सध्या एवढ्या अडचणी उद्भवत असतानाही ऑस्ट्रेलिया संघ या दौऱ्यावर आला, यासाठी जयसूर्याने त्यांचे आभार मानले होते. ऑस्ट्रेलियाने या दौऱ्यात टी-२०, वनडे आणि कसोटी मालिका खेळल्या. उभय संघातील टी-२० मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकली, तर वनडे मालिकेत श्रीलंकन संघाने जिंकली. कसोटी मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता, पण दुसऱ्या सामन्यात श्रीलंकने एक डाव आणि ३९ धावांच्या मोठ्या अंतराने विजय मिळवला होता. कसोटी मालिका १-१ अशा बरोबरीवर सुटली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
सचिनचा रेकॉर्ड आता मोहम्मद शमी तोडणार, कर्णधार रोहितकडेही विक्रम रचण्याची संधी
सिंगापूर ओपन २०२२: सलग दोन सेट जिंकत पीव्ही सिंधूने फायनलमध्ये मारली धडक
मुंबई इंडियन्सचा धुरंधर TNPL मध्ये घालतोय धुमाकूळ, सूर्यकुमार यादवचं वाढवतोय टेंशन





