भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघात ३ सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. या तीन सामन्यांच्या मालिकेला गुरुवारपासून (२४ फेब्रुवारी) सुरुवात होणार आहे. यातील पहिला सामना लखनऊ येथे पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी येत आहे. आपल्या जबरदस्त गोलंदाजीने भारतीय फलंदाजांच्या नाकी नऊ आणणारा श्रीलंकेचा गोलंदाज या मालिकेतून बाहेर पडला आहे.
खरं तर या महिन्याच्या सुरुवातीलाच श्रीलंका क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना श्रीलंकेचा गोलंदाज वनिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) कोरोना व्हायरसच्या तावडीत सापडला होता. त्यानंतर तो आतापर्यंत बरा झालेला नाहीये. मंगळवारी (२२ फेब्रुवारी) झालेल्या त्याच्या चाचणीमध्ये त्याचा अहवाल पुन्हा एकदा पॉझिटिव्ह आला. त्यामुळे श्रीलंका संघासाठी ही धोक्याची घंटीच आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हसरंगाला झाली होती कोरोनाची लागण
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कुशल मेंडिस आणि बिनुरा फर्नांडोनंतर कोरोनाची लागण होणारा तिसरा श्रीलंकन खेळाडू ठरला होता. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया संघात ५ टी२० सामन्यांची मालिका खेळवण्यात आली होती. त्यापैकी हसरंगाला ३ सामने खेळता आले नव्हते. ही मालिका श्रीलंका संघाने १-४ ने गमावली होती. त्याने खेळलेल्या २ सामन्यांपैकी पहिल्या सामन्यात ३८ धावा देत ३ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच दुसऱ्या सामन्यात त्याने ३३ धावा देत २ विकेट्स आपल्या खिशात घातल्या होत्या.
श्रीलंका संघाचा भारत दौरा
श्रीलंका संघाला भारत दौऱ्यावर ३ टी२० सामन्यांच्या मालिकेव्यतिरिक्त २ कसोटी सामन्यांची मालिकाही खेळायची आहे. टी२० मालिकेतील पहिला सामना २४ फेब्रुवारी रोजी लखनऊच्या इकाना स्टेडिअमवर खेळला जाईल. त्यानंतर शेवटचे दोन्ही सामने २६ आणि २७ फेब्रुवारी रोजी धरमशाला येथे खेळले जातील. याव्यतिरिक्त पहिला कसोटी सामना मोहाली आणि दुसरा कसोटी सामना बंगळुरू येथे खेळवला जाईल.
आयपीएल २०२२च्या लिलावात हसरंगावर सर्वाधिक बोली
आयपीएल २०२२च्या लिलावात हसरंगाने कहर कारनामा केला. आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने त्याला १०.७५ कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावत आपल्या संघात सामील केले होते. विशेष म्हणजे, हसरंगा हा आयपीएल २०२२ ऑक्शनमध्ये एवढी जास्त बोली लागणारा महागडा श्रीलंकन खेळाडू आहे.
महत्त्वाच्या बातम्या-





