श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाची (Sri Lanka Women’s Cricket Team) युवा फलंदाज विश्मी गुणरत्नेनं (Vishmi Gunaratne) इतिहास रचला आहे. तिनं आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात शानदार शतक झळकावले. श्रीलंकेच्या महिला संघासाठी शतक झळकावणारी ती दुसरी महिला फलंदाज ठरली आहे. 18 वर्षीय विश्मी गुणरत्नेनं तिच्या 16व्या एकदिवसीय सामन्यात धमाकेदार शतक झळकावलं. तिनं 98 चेंडूत 101 धावांची शानदार खेळी खेळली, यादरम्यान तिनं 3 षटकार आणि 9 चौकार लगावले.
श्रीलंकेसाठी चमारी अटापट्टूनं एकूण 12 शतकं झळकावली आहेत आणि आता विश्मी गुणरत्नेचं शतक हे श्रीलंका संघाचे 13वे शतक होते. चमारी अटापट्टू व्यतिरिक्त श्रीलंकेसाठी अन्य कोणत्याही फलंदाजानं शतक झळकावलं नव्हतं, तर आता विश्मी गुणरत्ने अशी कामगिरी करणारी श्रीलंकेची दुसरी क्रिकेटपटू ठरली आहे. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात चमारी अटापट्टू आणि विश्मी गुणरत्ने यांनी श्रीलंकेसाठी सलामी दिली होती.
Vishmi Gunaratne blasts her maiden ODI century, becoming only the second Sri Lankan woman to achieve this feat! What an innings!🔥#IREvSL pic.twitter.com/eRrGNDNmr7
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) August 16, 2024
विश्मी गुणरत्नेचं वय सध्या 18 वर्ष 361 दिवस आहे. गुणरत्नेच्या (Vishmi Gunaratne) आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर तिनं श्रीलंकेसाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2022 मध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत तिनं 16 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये तिनं 26च्या सरासरीनं 390 धावा केल्या आहेत. यादरम्यान तिचा स्ट्राईक रेट 73.86 राहिला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिनं 2 अर्धशतक आणि 1 शतक झळकावलं आहे. 16 सामन्यात तिनं 47 चौकार आणि 4 उत्तुंग षटकार लगावले आहेत.
गुणरत्नेनं श्रीलंकेसाठी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येसुद्धा 2022 मध्येच पदार्पण केलं होतं. तिनं 43 टी20 सामने खेळले आहेत. 20.57च्या सरासरीनं तिनं 720 धावांचा केल्या. यादरम्यान तिचा स्ट्राईक रेट 92.30 राहिला आहे. टी20 मध्ये तिच्या नावावर 3 अर्धशतक आहेत, तर तिची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 73 आहे. टी20 मध्ये तिनं 87 चौकार आणि 6 षटकार लगावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
युवराज सिंग गुजरात टायटन्सचा मुख्य प्रशिक्षक का होणार? पाहा 3 मोठी कारणे
‘बाबर आझम’ नाही तर हे 3 स्टार फीट क्रिकेटर्स, माजी कर्णधाराचं खळबळजनक वक्तव्य
रिषभ पंतला बांग्लादेश मालिकेत संधी मिळणार? शमीच्या खेळावरही सस्पेंस!