---Advertisement---

टी20 वर्ल्ड कपपूर्वी श्रीलंकेची मोठी खेळी, भारतीय दिग्गज प्रशिक्षकाचा संघात समावेश!

On: बुधवार, जानेवारी 7, 2026 6:15 PM
---Advertisement---

टी-20 वर्ल्ड कप 2026 भारत आणि श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली खेळवला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेने वर्ल्ड कपची तयारी बऱ्याच काळापूर्वीच सुरू केली आहे. आता श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या मेगा इव्हेंटपूर्वी एक मोठा निर्णय घेत भारतीय प्रशिक्षकाचा आपल्या संघात समावेश केला आहे. वर्ल्ड कपपूर्वी हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. या प्रशिक्षकाने भारताला टी-20 वर्ल्ड कप 2024 जिंकवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेत विक्रम राठोड यांची फलंदाजी प्रशिक्षक (Bating Coach) म्हणून नियुक्ती केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राठोड 15 जानेवारीला श्रीलंका संघासोबत जोडले जातील.

टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये श्रीलंका आपल्या मोहिमेची सुरुवात 8 फेब्रुवारीपासून करेल, जिथे त्यांचा सामना आयर्लंडशी होईल. त्यानंतर श्रीलंका 12 फेब्रुवारीला ओमानविरुद्ध दुसरा सामना खेळेल, तर 16 फेब्रुवारीला त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल. लीग स्टेजमध्ये श्रीलंका आपला शेवटचा सामना 19 फेब्रुवारीला झिम्बाब्वेविरुद्ध खेळेल. याशिवाय, वर्ल्ड कपपूर्वी श्रीलंका आपल्या मायदेशात पाकिस्तानविरुद्ध 3 सामन्यांची टी-20 मालिका देखील खेळणार आहे. श्रीलंकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी प्राथमिक संघाची घोषणा केली असून, यामध्ये दासून शनाका याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---