ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीचा निकाल लावण्याआधीच भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान पक्के केले. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना निकाली निघाल्यानंतर डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्याच्या चित्र स्पष्ट झाले. अंतिम सामन्यात आता ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघ आमने सामने असतील.
जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) स्पर्धेचा अंतिम सामना 7 ते 11 जून यादरम्यान खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाने इंदोर (तिसरी कसोटी) कसोटीत भारताला मात दिल्यानंतर अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जागा पक्की केली. अशात अंतिम सामन्यात पोहोचणारा दुसरा संघ बनण्यासाठी भारत आणि श्रीलंका प्रमुख दावेदार होते. भारताकडे अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी सर्वात पहिला मार्ग म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्धचा चौथा कसोटी सामना जिंकणे, हा होता. तर दुसरा मार्ग श्रीलंकन संघाच्या प्रदर्शनावर अवलंबून होता.
https://www.instagram.com/p/CpuD1YYM58s/?utm_source=ig_web_copy_link
श्रीलंकन संघाने जर न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवला, तर अंतिम सामन्यात श्रीलंका ऑस्ट्रेलिविरुद्ध खेळू शकत होता. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच कसोटीत पराभव स्वीकारावा लागल्याने श्रीलंका आता अंतिम सामन्यात पोहोचू शकणार नाही. असात भारताचे अंतिम सामन्यात स्थान पक्के झाले आहे. भारत सलग दुसऱ्यांदा डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे.
दरम्यान, श्रीलंकेला या कसोटी सामन्यात पराभूत करण्यासाठी न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विलियम्सन याची भूमिका सर्वात महत्वाची राहिली. विलियम्सन विजय मिळवण्यासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत खेळला आणि विजय मिळवला देखील. शेवटच्या चेंडूवर विलियम्सनने एक धाव घेत श्रीलंकेला पराभवाची धूळ चारली. विलियन्सनने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 40 वे तर कसोटी कारकिर्दतील 27वे शतक सोमवारी (13 मार्च) पूर्ण केले.
The winning moment of New Zealand.
What a finish, Test cricket, you beauty. https://t.co/M82BU8nxW0
— Johns. (@CricCrazyJohns) March 13, 2023
(Sri Lanka’s defeat to New Zealand has qualified the Indian team for the WTC finals)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेंडा फ्रुविर्तोव्हाने जिंकली केपीबी ट्रस्ट आयटीएफ महिला ओपन! अंकिता रैना उपविजेती
WPL मध्ये सावळा गोंधळ! थर्ड अंपायरच्या निर्णयाविरोधातच रिव्ह्यू, क्रिकेट इतिहासात प्रथमच असं घडलं