बेन स्टोक्स याच्या नेतृत्वात इंग्लंडने नुकतीच न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. मालिकेत न्यूझीलंड आणि इंग्लंडने प्रत्येकी एक-एक सामना जिंकला. उभय संघांतील ही मालिका बरोबरीवर सुटल्यानंतर स्टोक्स त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. लवकरच तो आयपीएल 2023 साठी भारतात दाखल होईल. तत्पूर्वी रविवारी (12 मार्च) लंडच्याच्या किंग्ज क्रॉस रेल्वे स्टेशनवरून स्टोक्सची कपड्यांची बॅग चोरीला गेली.
इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) हंगामात स्टोक्स चेन्नई सुपर किंग्जचा भाग आहे. न्यूझीलंडविरुद्धची मालिका संपल्यानंतर दरम्यानच्या काळात बेन स्टोक्स (Ben Stokes) याला आराम करण्यासाठी आणि कुटुंबासाठी वेळ मिळाला आहे. पण अशातच स्टोक्सने आपल्या सोशल मीडिया खात्यावरून आश्चर्यकारक माहिती चाहत्यांसोबत शेअर केली. लंडनमधील किंग्ज क्रॉस रेल्वे स्टेशनवरून अज्ञातांनी त्याची बॅघ चोरी केली आहे. आपल्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून ही माहिती शेअर स्टोक्सने लिहिले, “ज्या कोणी किंग्ज क्रॉस स्टेशनवरून माझी बॅग चोरली आहे त्यांच्यासाठी. माझे कपडे तुला खूप मोठे व्हावे अशी आशा आहे.” स्टोक्सने याचसोबत एक रागावलेली इमोजी देखील शेअर केली आहे.
To who ever stole my bag at King’s Cross train station.
I hope my clothes are to big for you ya absolute ****** ????— Ben Stokes (@benstokes38) March 12, 2023
स्टोक्सच्या या सोशल मीडिया पोस्टवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. काहींनी या पोस्टखाली मजेशीर, तरत काहींनी चिंता व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहीजन असेही म्हणत आहेत की, “बॅग सोड, पिवळ्या रंगाची जर्सी तुझी वाट पाहत आहे.” दरम्यान, आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने स्टोक्सला 16.25 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. काही दिवसांपूर्वी स्टोक्सने तो आगामी आयपीएल हंगामासाठी उपलब्ध असणार आहे, अशी पुष्टी देखील दिली होती. आयपीएलचा हा 16 वा हंगाम 31 मार्च रोजी सुरू होईल. पहिला सामना जतविजेत्या गुजराद टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाईल.
(Ben Stokes’ bag of clothes was stolen from a railway station)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WPL मध्ये सावळा गोंधळ! थर्ड अंपायरच्या निर्णयाविरोधातच रिव्ह्यू, क्रिकेट इतिहासात प्रथमच असं घडलं
जडेजाच्या त्या शॉटवर विराटसह प्रशिक्षक आणि ड्रेसिंग रूम नाराज? माजी दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया