भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अहमदाबाद कसोटी सामन्यात उस्मान ख्वाजा शक्यतो दुसऱ्यांदा फलंदाजीला येणार नाही. उभय संघांतील या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी ख्वाजाने पहिल्या डावात 180 धावांची खेळी केली होती. अशात दुसऱ्या डावात देखील त्याच्याकडून अशाच धमाकेदार प्रदर्शनाची अपेक्षा चाहत्यांना असताना तो खेळणार नसल्याची माहिती मिळाली. सामन्याच्या चौथ्या दिवशी झालेल्या दुखापतीमुळे तो दुसऱ्या डावात खेळणार नसल्याचे सांगितले जात आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. मालिकेतील हा चौथा आणि शेवटचा सामना दोन्ही संघांच्या फलंदाजांना ताबडतोड खेळी केली. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियासाठी उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) आणि कॅमरून ग्रीन (114) यांनी शतके ठोकली. तर भारतासाठी विराट कोहली (186) आणि शुबमन गिल (128) यांनी शतकीय योगदान दिले. सामन्याच्या चौथ्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना उस्मान ख्वाजाच्या पायाला दुखापत झाली. अशात याच कारणास्तव सामन्याच्या शेवटच्या दिवशी फलंदाजीला येणार नसल्याचे बोलले जात आहे.
पायाच्या दुखापतीनंतर ख्वाजाला स्कॅन करण्यासाठी नेले गेले, पण स्कॅनमध्ये दुखापतीविषयी काही स्पष्ट माहिती मिळू शकली नाही. म्हणजेच ख्वाजाची दुखापत गंभीर नाही, असेच दिसते. असे असले तरी, पायच्या वेदना कमी होत नसल्याने तो सलामीसाठी आला नाही. चौथ्या दिवशी अखेरच्या सत्रात भारतीय संघ सर्वबाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाला दुसऱ्यांदा फळंदाजीची संधी मिळाली. ऑस्ट्रेलियासाठी ट्रेविस हेड आणि फिरकीपटू मॅथ्यू कुह्नेमन याने डावाची सुरुवात केली. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने नाबाद 3 धावा केल्या.
सामन्याच्या शेवटच्या दिवशी पहिल्याच सत्रात रविचंद्रन अश्विन याच्या फिरकी चेंडूवर कुह्नेमन 6 धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाने पहिली विकेट गमावल्यानंतर ख्वाजा दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणे अपेक्षित होते. पण दुसऱ्या क्रमांकावर देखील तो फलंदाजीला आला नाही. कुह्नेमनने विकेट गमावल्यानंतर संघ व्यवस्थापनाने मार्नस लाबुशेन याला खेळपट्टीवर पाठवले. दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी. पहिल्यांदा फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाने 480 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या. प्रत्युत्तरात भारताने 571 धावा करून सर्व विकेट्स गमावल्या. पहिल्या डावानंतर भारतीय संघाने 91 धावांची आघाडी मिळवली. अवघ्या काही तासांचा खेळ राहिला असल्यामुळे सामना अनिर्णित राहणार, हे जवळपास पक्के म्हणता येईल.
(It is being said that Usman Khawaja will not bat in the second innings of the Ahmedabad Test due to injury)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सचा विजयरथ सुसाट! युपीला नमवत WPL मध्ये नोंदवला सलग चौथा विजय
WPL मध्ये सावळा गोंधळ! थर्ड अंपायरच्या निर्णयाविरोधातच रिव्ह्यू, क्रिकेट इतिहासात प्रथमच असं घडलं