---Advertisement---

मुंबई इंडियन्सचा विजयरथ सुसाट! युपीला नमवत WPL मध्ये नोंदवला सलग चौथा विजय

On: रविवार, मार्च 12, 2023 10:59 PM
---Advertisement---

वुमेन्स प्रिमियर लीगमध्ये रविवारी (12 मार्च) मुंबई इंडियन्स विरुद्ध युपी वॉरियर्झ हा सामना खेळला गेला. ब्रेबॉर्न स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात दोन्ही संघ विजयाच्या इराद्याने मैदानात उतरले. सामन्याच्या सुरुवातीला मुंबईवर काहीसे दडपण आणलेल्या युपीने नंतर मात्र आपली लय गमावली. गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीनंतर कर्णधार हरमनप्रीत कौर हिने ठोकलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने 8 विकेट्सने सामना आपल्या नावे केला. मुंबईचा हा सलग चौथा विजय ठरला.

 

स्पर्धेत आतापर्यंत एकही पराभव न पाहिलेल्या मुंबई इंडियन्सला नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजीची संधी मिळाली. सायका इशाकने षटकात संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर किरण नवगिरेने आक्रमक 17 धावा केल्या. दोन फलंदाज बाद झाल्यानंतर कर्णधार एलिसा हिली व ताहलिया मॅकग्राने संघाचा डाव सावरला. दोघींनी आपापली अर्धशतके पूर्ण करत 82 धावांची भागीदारी केली. सायका इशाकने 17 व्या षटकात या दोघींनाही बाद करत युपीला जोरदार हादरा दिला. त्यानंतर इतर फलंदाज अपेक्षित धावा करू न शकल्याने युपी केवळ 159 धावांवर पोहोचू शकला.

या धावांचा पाठलाग करताना मुंबईला मॅथ्यूज व यास्तिका भाटियाने 58 धावांची सलामी दिली. मात्र, राजेश्वरी गायकवाड व सोफी एक्लस्टनने त्यांना त्याच धावसंख्येवर बाद करत मुंबईला अडचणीत टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्णधार हरमनप्रीत कौर व नॅट सिव्हर-ब्रंटने मुंबईचा डाव सावरला. दोघींनी युपीच्या गोलंदाजांना संधी न देता खराब चेंडूंचा समाचार घेतला. हरमनने स्पर्धेतील आपले दुसरे अर्धशतक पूर्ण केले. सिव्हर-ब्रंटने नाबाद 45 व हरमनने नाबाद 53 धावा करून संघाला आठ विकेट्सने विजय मिळवून दिला. हरमनला या खेळीसाठी सामनावीर पुरस्कार दिला गेला.

(WPL 2023 Mumbai Indians Beat UP Warriorz By 8 Wickets Captain Harmanpreet Kaur Shines Register Fourth Win)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विश्वविजेत्या इंग्लंडची नाचक्की! दुबळ्या बांगलादेशने सलग दुसऱ्या सामन्यासह केली टी20 मालिका नावे
जोड्या जबरदस्त! टीम इंडियाच्या फलंदाजांनी अहमदाबादमध्ये रचला इतिहास, 90 वर्षात प्रथमच असं घडलं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---