श्रीलंका क्रिकेट संघाचे सध्या वाईट दिवस सुरू आहेत. पाठोपाठ सामन्यात पराभूत झाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहे. त्यातच अजून एका गोष्टीची भर पडल्याने संघाच्या ड्रेसिंगरूमचे वातावरण बिघडले आहे.
श्रीलंका वन-डे संघाचा नवीन कर्णधार थिसारा परेरा आणि टी20चा कर्णधार लसिथ मलिंगा हे दोघे याला कारणीभूत आहे. या दोघांमधील संवाद सध्या मलिंगाच्या पत्नीमुळे बंद आहे.
झाले असे की, मलिंगाच्या पत्नीने परेराबाबत सोशल मिडीयावर एक कमेंट टाकली होती. तेथूनच या सगळ्या प्रकरणाला सुरूवात झाली आहे. त्यामध्ये तिने परेरावर संघात जागा पक्की करण्यासाठी श्रीलंकेच्या क्रिडामंत्र्याची भेट घेतल्याचा आरोप लावला आहे.
याच्या प्रत्युत्तरात परेराने 2018मधील त्याच्या खेळाची कामगिरी फेसबुकवर टाकली आहे. यामध्ये त्याने अप्रतिम कामगिरी केली असल्याचे लक्षात येत आहे. यावेळी त्याने श्रीलंका क्रिकेट बोर्डला एक पत्रही लिहले आहे.
‘कर्णधाराच्या पत्नीने जे आरोप केले त्यावर लोक विश्वास ठेवू शकतात. त्याचबरोबर यामुळे खेळाडूंचे स्वभाव बदलले असल्याने ड्रेसिंगरूमचे वातावरणही बिघडले आहे’, असे परेराने त्या पत्रात लिहले आहे.
‘या प्रकरणामुळे संघाचे जगामध्ये हसे होत आहे’, असेही परेराने म्हटले आहे.
सध्या श्रीलंकेचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. यामध्ये 2 कसोटी सामन्यातील पहिल्या कसोटी सामन्यात त्यांना एक डाव आणि 40 धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 4 बाद 384 धावांचा डोंगर उभा केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–वाढदिवस विशेष: एक हात मोडला असताना ग्रॅमी स्मिथ आला मैदानात, पुढे काय झाले पहाच!






