पुढिल वर्षी जानेवारीमध्ये झिम्बाब्वेचा संघ (Zimbabwe) भारत दौरा करणार होता. पण आयसीसीने झिम्बाब्वेवर घातलेल्या बंदीचा विचार करता बीसीसीआयने(BCCI) झिम्बाब्वे ऐवजी श्रीलंका संघाला(Sri Lanka) तीन टी20 सामन्यांची मालिका (T20I series) खेळण्यासाठी येण्याचे आमंत्रण दिले आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही ते या टी20 मालिकेत सहभागी होण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे बुधवारी बीसीसीआयने श्रीलंकेच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक जाहिर केले आहे.
श्रीलंका संघ भारताच्या या दौऱ्यात 5 जानेवारी ते 10 जानेवारी दरम्यान 3 टी20 सामने खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 5 जानेवारीला गुवाहाटी येथे होईल. त्यानंतर दुसरा सामना 7 जानेवारीला इंदोरला तर तिसरा सामना 10 जानेवारीला पुण्यात होईल.
2020 मधील भारतीय संघाची(Team India) ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका असणार आहे.
असे आहे भारत विरुद्ध श्रीलंका संघात होणाऱ्या टी20 मालिकेचे वेळापत्रक –
5 जानेवारी – पहिला टी20 सामना – गुवाहाटी
7 जानेवारी – दुसरा टी20 सामना – इंदोर
10 जानेवारी – तिसरा टी20 सामना – पुणे
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–एमएस धोनीच्या निवृत्तीबद्दल माजी संघसहकारी युवराज सिंग म्हणाला…
–बरोबर एकवर्षांपूर्वी ‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीचे ते अधूरे स्वप्न झाले होते पूर्ण…
–या खेळाडूंकडून भारतीय क्रिकेटपटूंना मिळते फिटनेससाठी प्रेरणा, कोहलीने केला खूलासा