भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू श्रीधरन श्रीराम मागच्या मोठ्या काळापासून ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघासाठी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आला आहे. परंतु आता श्रीरामने ऑस्ट्रेलियन संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काही वृत्तांनुसार श्रीरामने हा निर्णय आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी घेतला असू शकतो.
ऑस्ट्रेलियन संघाला पुढच्या वर्षी भारत दौऱ्यावर यायचे आहे. तत्पूर्वी श्रीधरन श्रीराम (Sridharan Sriram) याने संघाची साथ सोडल्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा धक्का म्हणता येऊ शकतो. तसेच आगामी टी-२० विश्वचषकात देखील श्रीराम ऑस्ट्रेलियन संघासोबत असणे अपेक्षित होते. तो ऑस्ट्रेलियान संघाच्या फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत होता. २०१५ पासून ऑस्ट्रेलियन संघाच्या सपोर्ट स्टाफचा तो भाग राहिला आहे.
यापूर्वी २०१६ साली ऑस्ट्रेलियाचा भारत दौऱ्यात तो संघासोबत होता. याच दौऱ्यात तेव्हाचे ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक डेरेन लिमन यांनी श्रीरामनला फिरकी गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले होते. तेव्हापासून मागच्या सहा वर्षात त्याने ही भूमिका चोख पार पाडली आहे. अशात आता संघाची साथ सोडताना श्रीराम म्हणाला की, “ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये सहा वर्ष घालवल्यानंतर मी जड अंतकरणाने ऑस्ट्रेलियन पुरुष संघामी सध्या पार पाडत असेलेली सहायक प्रशिक्षकाची भूमिका सोडत आहे.”
“मला वाटते की, संघाला लक्षात घेता मी हे पद सोडलेले उपयुक्त ठरेल. असे झाले, तर त्यांना दोन विश्वचषक आणि जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल. हा माझ्यासाठी क्रिकेटचे सर्व प्रकार, विश्वचषक आणि ऍशेसमध्ये काम करण्याचा एक चांगला अनुभव राहिला आहे,” असेही श्रीराम पुढे बोलताना म्हणाला.
दुसरीकडे माध्यमांमध्ये अशा चर्चा रंगल्या आहेत की, श्रीराम आयपीएलमध्ये स्वतःच्या जबाबदारीकडे अधिक लक्ष देण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाची साथ सोडत आहे. तो २०१९ पासून आरसीबीच्या सपोर्ट स्टाफचा भाग आहे. ऑस्ट्रेलियातील एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, श्रीरामने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या प्रशिक्षकपदाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि चेन्नईमध्ये कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
ऑस्ट्रेलियन संघासोबत कार्यरत असताना श्रीरामने नाथन लियोन, एडम जम्पा, मिशेल स्वेपसन, ग्लेन मॅक्सवेल आणि मार्नस लाबुशेन अशा फिरकी गोलंदाजांसह काम केले आहे. भारतीय संघासाठी त्याने २००० ते २००४ यादरम्यानच्या काळात आठ एकदिवसीय सामने खेळले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
रेणुका सिंगची ऐतिहासिक कामगिरी, बनली झुलन गोस्वामीनंतर ‘हा’ पराक्रम करणारी दुसरी भारतीय
CWG 2022: नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय, ‘या’ खेळाडूचे पदार्पण; पाहा प्लेइंग XI
रोहित काढणार वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा घाम! नेट्समध्ये सिग्नेचर पुल शॉट दिसला मारताना