सध्या इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत पहिल्यांदाच महिला क्रिकेटचा समावेश केला गेला आहे. स्पर्धेत खेळल्या जाणारे क्रिकेट सामने टी-२० प्रकारातील आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियावर या दोन बलाढ्य संघातील सामन्याने स्पर्धेची सुरुवात झाली. भारतासाठी या सामन्यात वेगवान गोलंदाज रेणुका सिंगने जबरदस्त गोलंदाजी केली आणि एका खास विक्रमांची नोंद देखील केली.
भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मर्यादित २० षटकांमध्ये भारतीय संघ १५४ धावा करू शकला. प्रत्युत्तरा भारतीय संघाने गोलंदाजी देखील अप्रतिम केली. गोलंदाजी करताना भारताने पॉवरप्लेच्या सहा षटकांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाच्या पहिल्या चार विकेट्स घेतल्या. एकट्या रेणुका सिंग (Renuka Singh) हिने भारतासाठी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या चार विकेट्स घेतल्या होत्या.
रेणुका सिंग आता भारतीय महिला संघाची दुसरी अशी गोलंदाज बनली आहे, जिने टी-२० आंतरराष्ट्रीयमधील एका सामन्यात चार किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. यापूर्वी दिग्गज गोलंदाज झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) हिने २०१२ मध्ये विशाखापट्टणममध्ये खेलल्या गेलेल्या सामन्यात अशी कामगिरी केली होती. आता या यादीत रेणुका सिंग या यादीत नव्याने सहभागी झाली आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील हा सामना बर्मिंघममध्ये खेळला गेला. विशेष बाब ही आहे की, झुलन आणि रेणुकाने या दोघींनीही ही कामगिरी ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धचं केली आहे.
आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये एका सामन्यात चार किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणाऱ्या भारतीय महिला गोलंदाज
झुलन गोस्वामी विरुद्ध ऑस्ट्रेलिया (विशाखापट्टणम, २०१२)
रेणुका सिंग विरुद्ध ऑस्ट्रेलिया (बर्मिंघम, २०२२)
दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर भारताने प्रथम फलंदाजी करतान ८ विकेट्सच्या नुकसानावर १५४ धावा केल्या. शेफाली वर्मने ४८, तर कर्णधार हरमनप्रीत कौरने ५२ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या जेस जोनासरने देखील रेणुका सिंगप्रमाणेच ४ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ जेव्हा फलंदाजीसाठी आला, तेव्हा त्यांनी अवघ्या ३४ धावांवर चार विकेट्स गमावल्या होत्या. यामध्ये एलिसा हिली, बेथ मुनी, कर्णधार मेग लेनिंग आणि ताहलिया मॅकग्रा यांचा समावेश होता. या चारही विकेट्स रेणुकाच्या नावावर झाल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ऐतिहासिक! हरमनप्रीतने अर्धशतक करत मिळवला ‘हा’ बहुमान, ठरली पहिलीच भारतीय क्रिकेटर
पहिली आणि एकमेव! मितालीलाही जे जमलं नाही, ते हरमनप्रीतने केलं; बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध रचला इतिहास
रोहित काढणार वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा घाम! नेट्समध्ये सिग्नेचर पुल शॉट दिसला मारताना






