---Advertisement---

ऐतिहासिक! हरमनप्रीतने अर्धशतक करत मिळवला ‘हा’ बहुमान, ठरली पहिलीच भारतीय क्रिकेटर 

On: शुक्रवार, जुलै 29, 2022 5:55 PM
Harmanpreet-Kaur
---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात शुक्रवारी (२९ जुलै) बर्मिंघम येथे कॉमनवेल्थ गेम्स २०२२ चा पहिला सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ८ विकेट्सच्या नुकसानावर १५४ धावा केल्या. भारतीय संघाला ही धावसंख्या उभारून देण्यात कर्णधार हरमनप्रीत कौर हिचा मोठा वाटा राहिला. तिने एका बाजूने विकेट्स जात असताना झुंजार अर्धशतक झळकावले. या अर्धशतकासह तिने ऐतिहासिक विक्रमही आपल्या नावावर केला आहे.

स्म्रीती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी मिळून भारतीय संघाला ताबडतोब सुरुवात करून दिली. परंतु स्म्रीती २४ धावा करून बाद झाली. त्यानंतर शेफालीने मोर्चा सांभाळत ४८ धावांची खेळी केली. सलामी जोडीची विकेट पडल्यानंतर इतर फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीपुढे जास्त वेळ टिकू शकल्या नाहीत. अशात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत हरमनप्रीतने डाव सावरला.

तिने ३४ चेंडूत १ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने ५२ धावांची प्रशंसनीय खेळी केली. तिच्या या खेळीमुळे भारतीय संघ १५० धावांचा आकडा पार करू शकला. या अर्धशतकासह ती कॉमनवेल्थ गेम्समध्ये अर्धशतक करणारी जगातील पहिलीच महिला फलंदाज बनली आहे. तसेच असा बहुमान मिळवणारी पहिलीच भारतीय क्रिकेटरही (महिला आणि पुरुषांमध्ये) बनली आहे.

महिला क्रिकेट संघाने कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी पुरुषांचा संघ कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी झाला आहे. १९९८ मध्ये पहिल्यांदा कॉमनवेल्थ गेम्समध्ये खेळताना क्रेग इव्हान्सने जमैकाविरुद्ध अर्धशतक झळकावत पहिलावहिला अर्धशतकवीर बनण्याचा मान मिळवला होता. 

कॉमनवेल्थ गेम्समधील पहिले अर्धशतकवीर :-
पुरुष – क्रेग इव्हान्स विरुद्ध जमैका, १९९८
महिला – हरमनप्रीत कौर विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २०२२

असे आहेत दोन्ही संघ-

भारतीय संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्म्रीती मानधना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, मेघना सिंग, रेणुका ठाकूर.

ऑस्ट्रेलिया संघ: एलिसा हिली (यष्टीरक्षक), बेथ मूनी, मेग लॅनिंग (कर्णधार), ताहलिया मॅकग्रा, रॅचेल हेन्स, ऍशले गार्डनर, ग्रेस हॅरिस, जेस जोनासेन, अलाना किंग, मेगन शट, डार्सी ब्राउन

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

रोहित काढणार वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा घाम! नेट्समध्ये सिग्नेचर पुल शॉट दिसला मारताना

केएल राहुलचं टीम इंडियातील स्थान धोक्यात, प्रचंड चर्चेतील ‘हा’ क्रिकेटर घेणार जागा

बुमराहच्या जागी ‘या’ २३ वर्षीय गोलंदाजाला मिळणार प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी? यापूर्वी गाजवलीये आयपीएल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---