सध्या भारतीयं संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. यादौऱ्यातील ठराविक एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत भारताने वेस्ट इंडिजला ३-०ने क्लीन स्वीप दिला. यावेळी भारतीय संघातील अनेक दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा अन् माजी कर्णधार विराट कोहली यांचा देखील समावेश होता. या दोघांच्या अनुपस्थितीत शिखर धवनने टीम इंडियाचे नेतृत्व केले. मात्र, आता पुढे ५ टी२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी विराट कोहली वगळता अनेक खेळाडूंची संघात वापसी झाली आहे.
भारताचा कर्णधार रोहित शर्मा, यष्टीरक्षक रिषभ पंत, अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या यांच्यासह विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना इंग्लंड विरुद्धच्य़ा टी२० मालिकेनंतर विश्रांती देण्यात आली होती. यापैकी आता रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि रिषभ पंत यांचे संघात पुनरागमन होत आहे. शिवाय वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघात फेब्रुवारी २०२२नंतर आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी केएल राहुल देखील पुनरागमन करणार होता. मात्र, त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्याने आता त्याच्याजागी बदली खेळाडू म्हणून संजू सॅमसनला संघात स्थान मिळाले आहे.
We are back!
Hustle continues ????????
T20I prep begins ????????#TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/snuX3tEvfa
— BCCI (@BCCI) July 28, 2022
संजू सॅमसन याला याच वर्षी हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली आयर्लंड दौऱ्यात संघात स्थान मिळाले होते. त्यावेळी त्याने टी२० संघात आपली दावेदारी दाखवली होती. एका सामन्यात भारतीय संघाचा डाव सावरत त्याने अर्धशतकी खेळी देखील केली होती. त्यानंतर आता सध्या सुरू असलेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेत त्याला स्थान देण्यात आले होते. यावेळी त्याने या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ५१ चेंडूत ५४ धावांची महत्वपूर्ण खेळी करत भारताला विजयापर्यंत पोहचवण्यात मोलाचा वाटा घेतला होता. त्यानंतर आता त्याला के एल राहुलच्या जागी टी२० संघात स्थान मिळाले असले, तरी त्याला कोणत्या सामन्यात खेळण्याची संधी मिळेल याबाबत शंका आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
हार्दिकसारख्या ऑलराऊंडरचा शोध संपला! २५ वर्षीय खेळाडू ठोठावतोय टीम इंडियाचं दार
CWG 2022: नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय, ‘या’ खेळाडूचे पदार्पण; पाहा प्लेइंग XI
ब्रायन लारा स्टेडियमवर होणारा पहिलाच सामना पाण्यात जाणार?, वाचा काय आहे हवामान अन् पिच रिपोर्ट