---Advertisement---

हार्दिकसारख्या ऑलराऊंडरचा शोध संपला! २५ वर्षीय खेळाडू ठोठावतोय टीम इंडियाचं दार

On: शुक्रवार, जुलै 29, 2022 3:35 PM
Hardik-Pandya-Sai-Kishore
---Advertisement---

हार्दिक पंड्या हा भारतीय संघातील एक स्टार अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने दुखापतीनंतर कमबॅक करताना जबरदस्त कामगिरी केली. विरोधी संघाला त्याने आपल्या बॅट व बॉलने जबरदस्त उत्तर दिले आहे. सध्या भारतीय संघातील एक प्रमुख खेळाडू म्हणूनही त्याकडे पाहिले जाते. २०२२मध्ये याच हार्दिक पंड्याने भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळताना अनेक विक्रमही केले आहेत. परंतू आता त्याला पर्याय म्हणून एक मोठा खेळाडू तयार होत आहे.

भारतात इंडियन प्रीमीयर लीगपाठोपाठ तामिळनाडू प्रीमीयर लीग ही सर्वात प्रसिद्ध व मोठी लीग आहे. याच तामिळनाडू प्रीमीयर लीगमधील चेपॉक सुपर गिलीज संघाकडून खेळणारा साई किशोर सध्या जोरात चर्चेत आहे. तो येत्या काळात भारतीय संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून दावेदारी सांगताना दिसू शकतो. साई किशोरेचं संपुर्ण नाव रविश्रीवासन साई किशोर असे आहे. त्याने आयपीएलच्या ५ सामन्यात भाग घेतला होता, तसेच त्याची देशांतर्गत क्रिकेटमधील आकडेवारी चांगली राहिली आहे. 

बुधावारी चेपॉक सुपर गिलीज विरुद्ध नेल्लाई रॉयल किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात चेपॉक सुपर गिलीजकडून खेळताना साई किशोरने जबरदस्त अष्टपैलू कामगिरी केली. त्याने गोलंदाजीत ४ षटकांत २८ धावा देत १ विकेट तर फलंदाजीत २७ चेंडूत ४३ धावा केल्या. त्याच्या याच कामगिरीचा संघाला ५ विकेट्सने विजय मिळविण्यात मोठा फायदा झाला. 

साई किशोरचे सध्याचे वय २५ वर्ष आहे. त्याच्याबद्दल आजपर्यंत अनेक दिग्गजांनी मते व्यक्त केली आहे. तसेच तो लवकरच भारतीय संघाचा हिस्सा होईल, असेही म्हटले आहे.

टीनपीएलमधील साई किशोरची भन्नाट कामगिरी-
२०२२ आयपीएलमध्ये साई किशोर हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वाखील गुजरात टायटन्स संघाकडून ५ सामने खेळला होता. गुजरात संघाने त्याला शेवटच्या काही सामन्यात संधी दिली होती. या ५ सामन्यात त्याने ७.५६च्या इॅकॉनॉमीने ६ विकेट्स घेतल्या होत्या. त्याला या लीगमध्ये फलंदाजीची संधी मिळाली नव्हती, परंतू तो भाग असलेला गुजरात संघ मात्र आयपीएलच्या १५व्या हंगामाचा विजेता ठरला होता.

त्याने आयपीएलमध्ये मिळालेल्या याच अनुभवाचा मोठा फायदा टीएनपीएल अर्थात तामिळनाडू प्रीमीयर लीगमध्ये करुन घेतला. त्याने लीगच्या क्वॉलीफायर राऊंडमध्ये चांगली कामगिरी केली. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत ५ सामन्यात १४.१२च्या सरासरीने ८ विकेट्स घेतल्या आहेत तर फलंदाजीतही चांगली कामगिरी केली आहे. टीएनपीएलच्या २५व्या सामन्यात त्याने केलेल्या कामगिरीमुळे तो सामनावीर पुरस्काराचा मानकरीही ठरला आहे.

भारतीय संघात स्थान मिळण्याचे प्रमुख कारण- 
साई किशोरला भारतीय संघात लवकरच संधी मिळू शकते. यासाठी त्याला आयपीएल व टीएनपीएलमधील कामगिरीचा नक्कीच फायदा होऊ शकतो. खुद्द हार्दिक पंड्याने अनेक वेळा त्याचे कौतूक केले आहे. “त्याने आजपर्यंत दिलेल्या संधीचा खूप फायदा घेतला आहे, असे असले तरीही त्याला खूप सामने खेळण्याची संधी मिळाली नाही,” असे हार्दिक साई किशोरबद्दल बोलताना एकदा म्हणाला होता. दुसरीकडे भारतीय संघाला सध्या चांगल्या पर्यायी अष्टपैलू खेळाडूची गरज आहे. हार्दिक दुखापतग्रस्त असताना अशा खेळाडूची संघात वाणवा  जाणवत होती. ती साई किशोरमुळे नक्कीच भरुन काढली जाईल यात शंका नाही.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

टीम इंडियाचे टी२० विश्वचषकावर लक्ष! कॅप्टन शर्मा आणि कंपनी खेळणार ‘एवढे’ सामने

कॉमनवेल्थ गेम्समध्ये खेळणाऱ्या सर्व भारतीयांसाठी विराटचे खास ट्वीट, ‘अशा’ शब्दात दिल्या शुभेच्छा

पहिल्या टी२० सामन्यात कोणत्या खेळाडूंना मिळणार संधी?, अशी असेल भारताची संभाव्य प्लेइंग ११

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---