इंडियन प्रीमियर लीग 2024 चा तिसरा सामना ब्लॉकबस्टर असणार आहे. आयपीएल 2016 चे विजेते सनरायजर्स हैदराबाद समोर दोन वेळचे चॅम्पियन कोलकाता नाइट रायडर्सचं आव्हान असेल. हा सामना शनिवारी संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. ऑस्ट्रेलियाचे दोन दिग्गज वेगवान गोलंदाज, पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क आमनेसामने येणार असल्यानं ईडन गार्डन्सवर वरील या लढतीची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत.
आयपीएल 2024 पूर्वी कोलकाता नाईट रायडर्सनं लिलावात मिचेल स्टार्कला मोठ्या रकमेत विकत घेतलं आहे. तो नऊ वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन करतोय. हा डावखुरा वेगवान गोलंदाज जवळपास दशकभरानंतर केकेआरच्या चाहत्यांना विजेतेपदाची नवी आशा देईल. गौतम गंभीरचं पुनरागमनही केकेआरसाठी नव संजीवनी ठरू शकते. कारण त्याच्याच नेतृत्वाखाली संघानं दोन्ही ट्रॉफी जिंकल्या आहेत.
सनरायजर्स हैदराबादनं आयपीएलच्या या हंगामासाठी पॅट कमिन्सची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. त्याला लिलावात तब्बल 20.25 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आलं होतं. त्याचबरोबर हैदराबादकडे चांगले फिरकीपटू आहेत. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हेनरिक क्लासेन हैदराबादसाठी चांगली कामगिरी करू शकतो. तर वॉशिंग्टन सुंदर फिरकीमध्ये आपली जादू दाखवताना दिसेल.
कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद ड्रीम 11 फॅन्टसी टीम पुढीलप्रमाणे-
यष्टीरक्षक – हेनरिक क्लासेन (कर्णधार), फिल सॉल्ट
फलंदाज – ट्रॅव्हिस हेड, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रिंकू सिंह
अष्टपैलू – आंद्रे रसेल, एडन मार्करम, वॉशिंग्टन सुंदर
गोलंदाज – भुवनेश्वर कुमार, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 –
कोलकाता नाईट रायडर्स : रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, मिचेल स्टार्क, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती, एच राणा
सनरायजर्स हैदराबाद : ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर, पॅट कमिन्स (कर्णधार), शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक
महत्त्वाच्या बातम्या-
पंत-धवन नाही तर ‘या’ खेळाडूला बनवा कर्णधार! जाणून घ्या PBKS Vs DC सामन्याची ड्रीम 11 टीम
फाफ डू प्लेसिसनं सांगितलं चेन्नईविरुद्धच्या पराभवाचं कारण; म्हणाला, “पहिल्या डावात आम्ही…”
IPL 2024 । सलग 16 वर्ष सीएसकेला चेपॉकची साथ! हंगामातील पहिल्याच सामन्यात आरसीबी 6 विकेट्सने पराभूत