आयपीएल 2024 चा दुसरा सामना 23 मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज (PBKS vs DC) यांच्यात होणार आहे. हा सामना चंदीगडच्या महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दुपारी 3.30 वाजतापासून खेळला जाईल. हे मैदान प्रथमच एका आयपीएल सामन्याचं आयोजन करत आहे.
या मैदानाची खेळपट्टी गोलंदाजांना मदत करते. येथे फलंदाजांना धावा करण्यात अडचणी येऊ शकतात. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दरम्यान या स्टेडियममध्ये एकूण 23 टी20 सामने खेळले गेले, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं 15 सामने जिंकले. पहिल्या डावाची सरासरी 148 धावांची होती. अशा स्थितीत नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरेल.
दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार ऋषभ पंत 14 महिन्यांनंतर क्रिकेटच्या मैदानात परततोय, तर पंजाब किंग्जचं नेतृत्व शिखर धवनकडे आहे. गेल्या हंगामातील खराब कामगिरीनंतर दोन्ही संघ यावेळी चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील. मागच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स 9व्या तर पंजाब 8व्या क्रमांकावर होते. या सामन्यापूर्वी आम्ही चाहत्यांना ड्रीम-11 साठी संभाव्य संघ सांगत आहोत.
कीपर – ऋषभ पंत, प्रभासिमरन सिंग
फलंदाज – डेव्हिड वॉर्नर, शिखर धवन (उपकर्णधार), जॉनी बेअरस्टो
अष्टपैलू खेळाडू – मिचेल मार्श (कर्णधार), अक्षर पटेल, लियाम लिव्हिंगस्टन, सॅम करन
गोलंदाज – कुलदीप यादव, कागिसो रबाडा
पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा सामना तुम्हाला टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स या अधिकृत प्रसारक वाहिनीवर पाहता येईल. याशिवाय, Jio Cinema ॲप डाउनलोड करून, तुम्ही मोबाईलवर आयपीएल 2024 च्या सामन्यांच्या लाइव्ह स्ट्रीमिंगचा मोफत आनंद घेऊ शकता. या सामन्यासाठी दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 पुढीलप्रमाणे-
पंजाब किंग्ज – शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), ऋषी धवन, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग.
दिल्ली कॅपिटल्स – डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्किया, मुकेश कुमार, खलील अहमद.
महत्त्वाच्या बातम्या-
फाफ डू प्लेसिसनं सांगितलं चेन्नईविरुद्धच्या पराभवाचं कारण; म्हणाला, “पहिल्या डावात आम्ही…”
CSKvsRCB । धोनीने पुन्हा दाखवली यष्टीपाठी जादू, शेवटच्या चेंडूवर महत्वाचा फलंदाज धावबाद
आयपीएल हंगामातील पहिल्याच सामन्यात ‘सुपर कॅच’, रहाणेच्या चपळाईमुळे विराट तंबूत