पुणे (22 मार्च 2024)- के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये प्रमोशन फेरीचे प्रत्येक संघाचे 4 सामने पूर्ण झाले. 4 सामन्यानंतर अहमदनगर व कोल्हापूर संघ टॉप 2 मध्ये आहेत. तर मुंबई शहर व बीड संघ बॉटम 2 मध्ये आहेत. अहमदनगर व कोल्हापूर संघानी प्रमोशन फेरीत 4 पैकी 4 विजय मिळवले आहेत. तर बीड व मुंबई शहर यांनी 4 ही सामने गमावले आहेत.
आज झालेल्या पहिल्या सामन्यात पालघर संघाने 34 -22 असा विजय मिळवत प्रमोशन फेरीतील तिसरा विजय मिळवला. तर मुंबई शहर संघाला सलग चौथा पराभवाला सामोरे जावे लागले. पालघरच्या अभिनय सिंगच्या 3 सुपर टॅकल ने पालघर संघावर लोनची नामुष्की टळली. तसेच प्रतिक जाधव ने सुपर टेन पूर्ण करत पालघर संघाच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका निभावली. आजच्या दुसऱ्या अटीतटीच्या लढतीत कोल्हापूर ने 29-25 असा विजय मिळवत चौथा विजय मिळवला. कोल्हापूर कडून सौरभ फगारे व ओमकार पाटील हे विजयाचे शिल्पकार ठरले.
आज झालेल्या तिसऱ्या लढतीत रत्नागिरी संघाने बीड संघावर 34-23 अशी मात देत प्रमोशन फेरीत दुसरा विजय मिळवला. संपूर्ण सामन्यात रत्नागिरी संघाने 34 पैकी 17 गुण पकडीत मिळवले. रत्नागिरीच्या बचवाफळीने विजयात महत्वपूर्ण भूमिका निभावली. आज झालेल्या शेवटच्या सामन्यात अहमदनगर संघाने 60-35 अशी सांगली संघावर मात देत प्रमोशन फेरीतील चौथा विजय मिळवला. आशिष यादव, प्रफुल झवारे व सोमनाथ बेडके हे विजयाचे शिल्पकार ठरले. (Ahmednagar, Kolhapur team winning four in promotion round)
प्रमोशन फेरी गुणतालिका.
1. अहमदनगर – 24 गुण (4 सामने)
2. कोल्हापूर – 21 गुण (4 सामने)
3. पालघर – 19 गुण (4 सामने)
4. रत्नागिरी – 13 गुण (4 सामने)
5. सांगली – 11 गुण (4 सामने)
6. नंदुरबार – 7 गुण (4 सामने)
7. बीड – 1 गुण (4 सामने)
8. मुंबई शहर – 0 गुण (4 सामने)
महत्वाच्या बातम्या –
प्रमोशन फेरीत कोल्हापूर संघाचा विजयाचा चौकार
प्रमोशन फेरीत रत्नागिरी संघाचा दुसरा विजय, तर बीड संघाचा चौथा पराभव