बुधवारी (दि. 07 जून) जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. ढगाळ वातावरण असल्यामुळे रोहितला हा निर्णय योग्य वाटला. मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांनी भारतासाठी चांगली सुरुवात करून दिली. सिराजने यादरम्यान सलामीवीर उस्मान ख्वाजा या विस्फोटक खेळाडूला शून्यावर तंबूचा रस्ता दाखवत संघाला पहिली विकेट मिळवून दिली. यानंतर मार्नस लॅब्युशेन आणि डेविड वॉर्नर यांनी ऑस्ट्रेलिया संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी रचली.
मात्र, डगाळ वातावरण हटल्यानंतर डेविड वॉर्नर (David Warner) आणि मार्नस लॅब्युशेन (Marnus Labuschagne) यांनी मोकळ्या हाताने फटकेबाजी सुरू केली. शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि उमेश यादव (Umesh Yadav) यांच्या 7 षटकांमध्ये त्यांनी 6 चौकार मारले. यावेळी भारतीय गोलंदाज अडचणीत वाटत होते. अशात शार्दुलला यश मिळाले. मात्र, या विकेटचे श्रेय केएस भरत (KS Bharat) याला जाते.
भारतीय संघाने या सामन्यात चार वेगवान गोलंदाज आणि रवींद्र जडेजा याला फिरकीपटूच्या रूपात संघात घेतले. यष्टीरक्षक म्हणून ईशान किशन याच्या जागी केएस भरतला निवडले. अशात भरतनेही शानदार झेल पकडत संघाचा विश्वास सार्थ करून दाखवला. त्याचा यादरम्यानचा झेलाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/p/CtMA0DFPx0B/
कसा झाला बाद?
खरं तर, शार्दुलचा चेंडू लेग स्टम्पच्या बाहेर जात होता. आखुड खेळपट्टीवरील चेंडू वॉर्नरने हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. त्याने पुल शॉट न मारता लाँग लेगवर खेळण्याचा प्रयत्न केला. अशात चेंडू बॅटची कड घेत मागे गेला असता भरतने यष्टीमागे शानदार झेल पकडला. त्याने चपळाई दाखवत स्वत:च्या उजव्या बाजूला झेप मारली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला लंच ब्रेकपूर्वी आणखी एक धक्का बसला.
मैदानाबाहेर जाताना वॉर्नर खूपच नाराज दिसला. त्याने कठीण काळातून संघाला पुढे नेले होते. जेव्हा चेंडू स्विंग आणि वेगवान होत होता, तेव्हा तो टिच्चून फलंदाजी करत होता. असे वाटत होते की, तो मोठी धावसंख्या उभारेल. मात्र, तो 60 चेंडूत 43 धावा करून बाद झेलबाद झाला. (srikar bharat took a brilliant catch to dismiss david warner in wtc final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हे काय गार्डन बनवलंय’, ओव्हलची खेळपट्टी पाहून चाहते हैराण, युजरच्या प्रश्नावर कार्तिकचा भन्नाट रिप्लाय
WTC Finalमध्ये टॉवेल गुंडाळून का फिरत होता शमी? दिग्गज गोलंदाजाचा मोठा खुलासा