अद्याप अधिकृतरित्या आयसीसीची मान्यता नसली तरीही, मागील सहा वर्षांपासून खेळला जाणारा टी10 हा क्रिकेटचा सर्वात लहान प्रकार हळूहळू लोकप्रिय होत आहे. अबुधाबी येथे 23 नोव्हेंबरपासून अबुधाबी टी10 लीगचे सहावे पर्व सुरू होईल. त्याचवेळी आता श्रीलंका क्रिकेट बोर्डाने देखील पुढील वर्षी अशीच टी10 लीग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
आखाती देशांमध्ये टी10 क्रिकेटला मोठी प्रसिद्धी मिळते. यंदा अबुधाबी टी10 लीगचा सहावा हंगाम शेख झायद स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या दोन आठवड्यांच्या स्पर्धेमध्ये अनेक मोठे खेळाडू सहभागी होतील. क्रिकेटचा हा सर्वात छोटा प्रकार मानला जातो. या प्रकाराची लोकप्रियता लक्षात घेता श्रीलंका क्रिकेट बोर्डाने पुढील वर्षी अशीच लीग सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऍश्ले डी सिल्वा यांनी या संदर्भात बोलताना म्हटले,
“पुढील वर्षी डिसेंबरमध्ये आम्ही लंका प्रिमियर लीग आयोजित करू. मात्र, त्याचवेळी ऑगस्ट महिन्यात आम्ही लंका टी10 लीग सुरू करण्याचा विचार करत आहोत. या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळू शकतो.”
लंका टी10 लीगमध्ये पुरुषांचे सहा तर महिलांचे चार संघ सहभागी होतील. सध्या या स्पर्धेच्या आयोजन स्थळांविषयी फारशी माहिती दिली गेली नसली तरी, हंबनटोटा व कॅंडी येथे सामन्यांचे आयोजन होऊ शकते. बोर्डाला जवळपास 1600 खेळाडू नाव नोंदणी करण्याची आशा आहे. ही स्पर्धा 12 दिवसांची असेल.
श्रीलंका क्रिकेट बोर्ड टी10 क्रिकेटचा मोठा समर्थक राहिला आहे. अबुधाबी टी10 लीगसाठी आपल्या खेळाडूंना परवानगी देणारा तो आयसीसीचा पहिला पूर्ण सदस्य देश बनलेला. त्यानंतर वेस्ट इंडिज, बांगलादेश व अफगाणिस्तानने हा निर्णय घेतलेला.
(Srilanka Cricket Board Starts T20 League Next Year)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी गुन्हेगार नाहीये…’, चेंडूशी छेडछाड प्रकरणात अडकलेल्या दिग्गज ऑस्ट्रेलियन खेळाडूचे मोठे वक्तव्य
क्रिकेटच्या मैदानात वादळी खेळी करणारा सूर्यकुमार अभ्यासात हिरो की झिरो? घ्या जाणून