सध्या झिम्बाब्वे येथे आयसीसी वनडे विश्वचषक 2023 साठी क्वॉलिफायर सामने खेळले जात आहे. सुपर सिक्स फेरीत पोहोचलेल्या श्रीलंका आणि झिम्बाब्वे संघात रविवारी (2 जुलै) सामना झाला. या सामन्यात श्रीलंकेने 9 विकेट्स राखून मोठा विजय मिळवला. यासह आगामी वनडे विश्वचषकात क्वालिफायर एक म्हणून त्यांनी आपला प्रवेश निश्चित केला. त्यानंतर आता विश्वचषकातील श्रीलंकेच्या सामन्यांचे वेळापत्रक देखील समोर आले आहे.
आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 चे वेळापत्रक 27 जून रोजी जाहीर करण्यात आले आहे. पात्रता फेरीनंतर आता त्या वेळापत्रकाचे अंतिम स्वरूप समोर येईल. मात्र, श्रीलंका संघाने पात्रता फेरीतील आपले सर्व सामने जिंकून क्वालिफायर एक या जागेवर आपला हक्क निश्चित केला आहे. त्यामुळे आता श्रीलंका संघ कोठे कोठे खेळणार याबाबतची देखील निश्चिती झाली.
दसुन शनाका याच्या नेतृत्वातील श्रीलंका संघाने क्वालिफायर एक म्हणून जागा पक्की केल्यानंतर त्यांचा आता स्पर्धेतील पहिला सामना दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध होईल. हा सामना हैदराबाद येथे खेळला जाईल. त्यानंतर नऊ ऑक्टोबर रोजी देखील याच मैदानावर ते न्यूझीलंड विरूद्ध खेळतील. त्यानंतर 17 ऑक्टोबर रोजी वेस्ट इंडीजविरुद्ध धर्मशाला येथे तर, 21 ऑक्टोबर रोजी लखनऊ येथे दुसऱ्या क्वालिफायर संघाविरुद्ध खेळतील.
त्यांचा पुढील सामना 25 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध दिल्ली येथे पार पडेल. त्यानंतर 28 ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध कोलकाता येथे त्यांचा सामना होईल. तर, 3 नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तानविरूद्ध लखनऊ येथे त्यांचा सामना होईल. त्यानंतर 8 नोव्हेंबर रोजी पुण्यात इंग्लंड विरुद्ध ते खेळताना दिसतील. तर त्यांचा अखेरचा साखळी सामना 11 नोव्हेंबर रोजी भारताविरुद्ध मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर होईल.
विशेष म्हणजे याच वानखेडे स्टेडियमवर उभय संघांमध्ये 2011 वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना देखील खेळला गेला होता. यामध्ये भारतीय संघाने विजय मिळवलेला.
(Srilanka Qualified For 2023 ODI World Cup Look At Schedule)
महत्वाच्या बातम्या –
चहलला आयसीसी स्पर्धांमध्ये संधी मिळत नसल्याने पेटून उठला गांगुली, म्हणाला, ‘भारतीय संघाला…’
‘आग लगे बस्ती में, बाबा अपनी मस्ती में’, विंडीज हारताच गेलने शेअर केला व्हिडिओ, चाहत्याची कमेंट चर्चेत