---Advertisement---

कोरोनाचा दरारा! चक्क पीपीई किट घालून खेळाडूंना ट्रेनिंग देतायत श्रीलंकेचे प्रशिक्षक, बघा व्हिडिओ

On: गुरूवार, जुलै 15, 2021 9:00 AM
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघामध्ये १८ जुलैपासून मर्यादित षटकांची मालिका खेळली जाणार आहे. परंतु ही ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरू होण्यापूर्वीच श्रीलंका संघाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाला होता. श्रीलंका संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रांट फ्लॉवर आणि डेटा विश्लेषक जिटी निरोशन यांना कोरोनाची लागण होती. त्यामुळे श्रीलंका संघाच्या ताफ्यात भीतीचे सावट पसरले आहे. अशातच खेळाडू विलागिकरणाचा कालावधी पूर्ण करून मैदानात उतरले आहेत. परंतु श्रीलंका संघाचे प्रशिक्षक आगळ्या वेगळ्या प्रकारे सराव करून घेताना दिसून आले आहेत.

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आपल्या यूट्यूब चॅनेलवर खेळाडू सराव करत असतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये खेळाडू कसून सराव करताना दिसून येत आहेत. तर श्रीलंका संघाचे प्रशिक्षक आणि स्टाफ चक्क पीपीई किट घालून सराव करून घेताना दिसून येत आहे. हा प्रकार तुम्ही यापूर्वी कधीच पहिला नसेल. परंतु श्रीलंका संघाच्या ताफ्यात वाढती कोरोनाची भीती पाहता, प्रशिक्षकांनी हा निर्णय घेतला असावा.

दुसरीकडे शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघही यजमानांना कठोर आव्हान देण्यासाठी कसून सराव करत आहे. या मालिकेला १३ जुलैपासून प्रारंभ होणार होता. परंतु कोरोनाची भीती पाहता ही मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. वनडे मालिकेला १८ जुलै रोजी प्रारंभ होणार आहे. तर २५ जुलै ते २९ जुलै दरम्यान टी-२० मालिकेचा थरार रंगणार आहे.(Srilanka team coaches train team wearing ppe kits watch video)

श्रीलंका संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकांच्या चिंतेत होणार वाढ
श्रीलंका संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रांट फ्लॉवरच्या चिंतेत वाढ होऊ शकते. इंग्लंडहून परतल्यानंतर त्यांचा कोविड अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यामुळे श्रीलंका क्रिकेट बोर्ड हे जाणून घेण्याच्या प्रयत्नात आहेत की, ग्रांट फ्लॉवर कोरोना व्हायरसच्या संपर्कात आलेच कसे? त्यांनी कोविडच्या नियमांचे उल्लंघन केले आहे का? या गोष्टी जाणून घेण्यासाठी त्यांची एक चाचणी केली जाणार आहे. ही चाचणी त्यांचा विलगिकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यावर केली जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! इंग्लंडमधील २ भारतीय क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह, पाहा पहिली कसोटी खेळणार की नाही?

विघ्न संपेना! श्रीलंकेचा विस्फोटक फलंदाज जखमी, भारताविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकणार?

लाईट्स,कॅमेरा,ऍक्शन! श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या ‘यंगिस्तान’च्या फोटोशूटची पाहा खास झलक

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---