श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सध्या कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना गॉल या ठिकाणी खेळला जातोय. त्याचवेळी दुसरा सामना कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार होता. मात्र, आता कोलंबो येथील सामना देखील गॉल येथेच घेण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.
या कारणाने घ्यावा लागला निर्णय
नियोजित कार्यक्रमानुसार दुसरा कसोटी सामना २४ जुलैपासून कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार होता. परंतु, सध्या श्रीलंकेत भयानक आर्थिक संकट आले आहे. लोकांनी राजकीय तख्तापालट केल्यानंतर श्रीलंकेची राजधानी असलेले कोलंबो शहर पूर्णपणे आंदोलकांनी ताब्यात घेतलेय. या सर्वाचा परिणाम कसोटी सामन्यावर होऊ नये, म्हणून आयोजकांनी हा सामना गॉल येथेच खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाकिस्तान आणि श्रीलंका संघाला प्रवास करावा लागणार नाही.
श्रीलंका प्रीमियर लीगही स्थगित
दुसऱ्या कसोटीच्या स्थानात बदल केला असला तरी, ऑगस्ट महिन्यात होणारी लंका प्रीमियर लीग मात्र स्थगित करण्याचाच निर्णय श्रीलंका क्रिकेट बोर्डाने घेतला. १ ते २१ ऑगस्ट या काळात ही लीग होणार होती. परंतु बोर्डाने अनिश्चित काळासाठी लीग थांबवण्याचे जाहीर केले आहे. परंतु, लीग कधी सुरू होणार याबाबत त्यांनी कोणतीही तारीख सांगितलेली नाही.
श्रीलंकेत भयानक राजकीय व आर्थिक संकट
सध्या संपूर्ण श्रीलंकेत राजकीय व आर्थिक संकट आले आहे. लोकांनी गोटाबायो राजपक्षे यांची सत्ता उलटवून टाकली. सरकारने घेतलेल्या काही चुकीच्या निर्णयामुळे श्रीलंकेत महागाई वाढल्याने हा प्रकोप झाला. सध्या श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात इंधन तसेच जीवनवाश्यक वस्तूंचा तुटवडा पडला आहे. यासाठी जगभरातील देश श्रीलंकेला मदत करतायेत. श्रीलंकेतील सेलिब्रिटी देखील या सर्वप्रकारात लोकांना पाठिंबा देताना दिसून येत आहेत. श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याने या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
संघ ठरले आता ठिकाण अन् वेळही निश्चित! वाचा भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक
हा शुद्ध वेडेपणा! शतक पूर्ण होताच रिषभ पंतने इंग्लंडच्या गोलंदाजांना धरलं धारेवर, पाहा व्हिडिओ