बारा वर्षाखालील गटात सेंट पॅट्रिक्स तर चौदा वर्षाखालील गटात पीसीएमसी प्रशाला अजिंक्य पटकाविले आणि फादर शॉक स्मृती तिसऱ्या फादर आंतरशालेय हॉकी स्पर्धा 2023 मध्ये कौतुकास्पद कामगिरी केली ही स्पर्धा मेजर ध्यानचंद स्टेडियम येथे आयोजित करण्यात आली होती.
ही स्पर्धा एक्स लॉयला स्टुडंट्स नेटवर्क आणि लॉयला हायस्कूलद्वारे हॉकी महाराष्ट्राच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली होती. बारा वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीत सेंट पॅट्रिक्स संघाने लॉयलाचे आव्हान पेनल्टी शूट-आऊटद्वारे 3-0 ने परतविले. गोल शून्य बरोबरीत सोडवल्यानंतर शूट-आऊटचा उपयोग करण्यात आला. शूट-आऊटमध्ये सेंट पॅट्रिकच्या जोएल पाटेकर, अर्नव बी, शौर्य मेंगे यांनी गोल करण्यात यश मिळविले, तर पराभूत संघाकडून आरव जोशी, ईशान शेलार आणि राजवीर शिंदे यांचे प्रयत्न अयशस्वी झाले.
चौदा वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीत पीसीएमसी स्कूलने सेंट पॅट्रिकवर 3-0 असा सहज विजय मिळवला. प्रतिक सुतार आणि प्रथम पाटील यांनी प्रत्येकी एक गोल करीत मध्यंतरापर्यंत विजयी संघाला आघाडी मिळवून दिली. मध्यंतरानंतर अली शेखने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर केले आणि पीसीएमसी संघाची बाजू बळकट केली.
नितीन जोशी यांच्या उपस्थितीत लॉयला प्रशालेचे प्राचार्य फादर अनिश, प्राचार्य लोयोला एच.एस., फादर नेल्टन, ईएलएएनचे अध्यक्ष मनोज वाळवेकर, हॉकी महाराष्ट्रचे उपाध्यक्ष मनोज भोरे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आले.
सविस्तर निकाल-
12 वर्षांखालील मुले: सेंट पॅट्रिक प्रशाला 3 (जोएल पाटेकर, अर्नॉन बी, शौर्य मेंगे) बीटी लॉयला ‘ए’: ०
तिसरा क्रमांक -सेंट जोसेफ बॉईज (मॉडन प्रशाले कडून पुढे चाल)
वैयक्तिक पुरस्कार (12 वर्षांखालील मुले)
सर्वोत्कृष्ट फॉरवर्ड : शायन शेख (सेंट जोसेफ, खडकी)
सर्वोत्कृष्ट मिडफिल्डर: स्कायलर राय (लॉयला)
सर्वोत्कृष्ट बचावपटू : राजवीर शिंदे (लॉयला)
सर्वोत्कृष्ट गोलरक्षक : तन्मय थोरात (सेंट पॅट्रिक्स)
चौदा वर्षांखालील मुले: पीसीएमसी स्कूल: 3 (प्रतिक सुतार 22वे; प्रथम पाटील 47 वे; अली शेख 59वे ) bt सेंट पॅट्रिक्स ०
तिसरा क्रमांक – कर्नल भगत शाळा: 2 (कार्तिक पिल्ले 5वे, चेतन आठवले 28वे) वि.वि लॉयला
वैयक्तिक पुरस्कार (चौदा वर्षाखालील मुले)
सर्वोत्कृष्ट फॉरवर्ड: प्रिन्स पटियाल (पीसीएमसी स्कूल)
सर्वोत्कृष्ट मिडफिल्डर: शौर्य मेंगे (सेंट पॅट्रिक एचएस)
सर्वोत्कृष्ट बचावपटू: जेम्स निट्टा (सेंट पॅट्रिक एचएस)
सर्वोत्कृष्ट गोलरक्षक : ओंकार वळवी (पीसीएमसी स्कूल)(St. Patrick’s in the Under-12 category and PCMC Prashala in the Under-14 category)
महत्वाच्या बातम्या
Video: घोड्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता धोनी, पण पुढे घडलं ‘असं’ काही, माहीला म्हणावं लागलं, ‘अरे…’
ऑस्ट्रेलियाची प्रतिष्ठा पणाला! पाचव्या सामन्यात टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय, भारतीय संघात एक मोठा बदल