क्रिकेटटॉप बातम्या

Video: घोड्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता धोनी, पण पुढे घडलं ‘असं’ काही, माहीला म्हणावं लागलं, ‘अरे…’

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याची गणना जगातील दिग्गज खेळाडूंमध्ये होते. धोनीने त्याच्या फलंदाजी आणि नेतृत्वाने जगभरातील प्रेक्षकांच्या मनात मानाचे स्थान मिळवले आहे. त्याला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. खरं तर, धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन 3 वर्षे उलटली आहेत. मात्र, त्याच्या चाहत्यावर्गाची संख्या जराही कमी झाली नाहीये. धोनी सध्या क्रिकेट खेळताना दिसत नसला, तरीही त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. अशात त्याचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात तो घोड्यासोबत दिसत आहे.

धोनीचा व्हिडिओ व्हायरल
एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुफद्दल वोहरा नावाच्या युजरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) काही व्यक्तींसोबत दिसत आहे. यादरम्यान तो तिथे उपस्थितीत घोड्यांसोबत धोनी काहीतरी बोलताना दिसला. जेव्हा घोडा धोनीचा हात चाटत होता, तेव्हा त्याने प्रेमाने म्हटले की, “नाही, हा हात खाण्याचा नाहीये.”

माहीच्या या व्हिडिओवर नेटकरी प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत 2 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, शेकडो कमेंट्सही आल्या आहेत. एका युजरने लिहिले की, “धोनीची प्राण्यांविषयीचे प्रेम वेगळ्याच स्तराचे आहे.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “धोनी जमिनीशी जोडलेला व्यक्ती आहे.”

कधी घेतली निवृत्ती?
महेंद्र सिंग धोनी याने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, तो आयपीएल स्पर्धेत अजूनही खेळताना दिसतो. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल 2023 स्पर्धेचा किताब जिंकला होता. अशात आशा व्यक्त केली जात आहे की, धोनी आगामी आयपीएल 2024 (IPL 2024) हंगामात सीएसकेचा कर्णधार म्हणून खेळताना दिसेल. (ms dhoni showers love on horse former indian cricketer mahi said this know here)

हेही वाचा-
ऑस्ट्रेलियाची प्रतिष्ठा पणाला! पाचव्या सामन्यात टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय, भारतीय संघात एक मोठा बदल
‘त्याला T20 World Cupमध्ये…’, पाचव्या टी20पूर्वी युवा खेळाडूविषयी दिग्गजाचे मोठे विधान

Related Articles