जगभरातील अनेकांच्या लेखी क्रिकेट अजूनही बोरिंगच. कोण दिवसदिवस हा खेळ खेळणार? कोण पाहणार? असे प्रश्न अजूनही युरोपात आणि लॅटीन अमेरिकेत सर्रास विचारले जातात. तरीही याच क्रिकेटमध्ये जिवंतपणा आणण्याचे काम करतात कॉमेंटेटर्स. टोनी ग्रेग, रिची बेनो, हर्षा भोगले, जेफ्री बॉयकॉट, रवी शास्त्री यांच्या फक्त आवाजामुळे अनेक जण क्रिकेट पाहायला लागले. सगळ्यांनीच इंग्लिश कॉमेंट्रीने क्रिकेटचा एक नवा चाहतावर्ग निर्माण केला. मात्र, हे सारे झाले इंग्लिशचे. या सगळ्यांचा मान एका ठिकाणी, पण हिंदी कॉमेंट्री जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून या हिंदी कॉमेंट्रीचा एकच अनभिषिक्त सम्राट म्हणजे आकाश चोप्रा.
स्टार वाल्यांनी २०१० नंतर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कॉमेंट्रीच जबरदस्त फॅड आणलं. तसं तर हिंदी कॉमेंट्री रेडिओच्या जमान्यापासून सुरू आहे, पण आयपीएलपासून याला किक मिळाली. अनेक टॉपचे क्रिकेटर्स कॉमेंट्री करायला लागले. तेही चक्क हिंदीत. जेव्हा स्टार स्पोर्ट्सने इंटरनॅशनल मॅचेस दाखवायला सुरुवात केली, तेव्हापासूनच हिंदी कॉमेंट्रीचा एकप्रकारे पुनर्जन्म झाला. सुरुवातीला कपिल देव यांनी जाहिरात करत ‘अपनी भाषा’ प्रकारची ॲड करत याला सुरुवात केली. आपला सिद्धू आणि कपिल पाजी हिंदी कॉमेंट्रीचे दोन मूळ पुरुष… मात्र जेव्हा हे थांबले तेव्हापासून ती जागा घेतली आकाश चोप्राने.
खरंतर आकाश चोप्रा हे भारतीय क्रिकेटमधील चांगलंच माहित असलेलं नाव. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये असे म्हणायचे हा चोप्रा उभा राहिला म्हणजे आता आपण दिवसभर फक्त बॉलिंगच करायची. कमालीचा संयम आणि चांगली टेक्निक असल्याने तो दिवस दिवस बॅटिंग करायचा. आकाश चोप्रा पण दिल्लीच्या त्याच सोनेट क्लबचा प्लेयर, ज्या क्लबमधून तारक सिन्हा यांनी डझनभर इंडियन क्रिकेटर तयार केले. अगदी लहान वयात मोठ्या-मोठ्या इनिंग खेळायची सवय असल्याने तो भराभर यशाची शिखरे चढत होता. अशात २००३ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्याने टेस्ट डेब्यू केला. पहिल्या दोन मॅच कमाल खेळला. एकच फिफ्टी मारली असली तरी, त्याचा डिफेन्स आणि स्ट्राइक रोटेशन आपल्या कामाला येईल म्हणून, त्याला डायरेक्ट ऑस्ट्रेलिया टूरवर नेण्यात आले. त्या टूरच्या ऐतिहासिक सिडनी टेस्टमध्ये विरूसोबत शतकी भागीदारी करत त्यान आपल्या दम असल्याचं दाखवून दिलं.
हेही पाहा- टुकटुक खेळत करियर करणारा आकाश चोप्रा कसा झाला स्टार कॉमेंट्रेटर
पुढे, पाकिस्तान टुरवर थोडा फ्लॉप गेल्याने युवराजला चान्स मिळाला. युवराजनं संधी साधली. जोपर्यंत युवराज फ्लॉप झाला तोपर्यंत गौतम गंभीर नावाचा आणखी एक दिल्लीकर ओपनर तयार झालेला. गंभीर पुढे आला आणि चोप्रा कायमचा मागे पडला. आकाश चोप्राच १० टेस्टच इंटरनॅशनल करिअर संपलं. पुढे आणखी दशकभर डोमेस्टिक क्रिकेट खेळून त्याने रिटायरमेंट घेतली.
रिटायर झाल्यावर क्रिकेटर्स पुढे प्रामुख्याने तीन ऑप्शन असतात. एक कोच व्हायचं, दुसर कॉमेंटेटर व्हायचं नाहीतर सरळ एखादा बिजनेस टाकून सेट व्हायचं. त्यानं दुसरा ऑप्शन निवडला. आकाश चोप्रानं सुरुवातच हिंदी कॉमेंट्रीपासून केली. ग्राउंडवर शांत वाटणारा आकाश चोप्रा इतका बडबडा असेल, याची कोणाला कल्पनाही नव्हती. हिंदीवर कमालीचे प्रभुत्व, जोडीला पुराणातील दाखले, कविता, वाक्प्रचार, म्हणी यांच भांडार आणि कानाला बोर वाटणार नाही असा आवाज. आकाश चोप्रा लोकांना कॉमेंटेटर म्हणून आवडायला लागला.
कॉमेंट्री करता करता तो समीक्षकही अशी बनला. कोण कुठे चुकतो? कोण कसा खेळतो याचं ऍनालिसिस करू लागला. त्याला नाव ठेवणारेही कमी नाहीत. आपलं करिअर किती आपण बोलतो किती? असे म्हणत अनेक जण त्याला ट्रोल करतात, पण अनेक क्रिकेटर्स मान्य करतात की, आकाश भाईचं ऍनालिसिस बाप असतं आणि आम्हाला त्याचा फायदा होतो. एखादवेळी चालू कॉमेंट्री टिप्स दिल्याने त्याला शिव्याही पडतात. त्याच्या धोनी प्रेमामुळे बाकीच्या क्रिकेटचेही चाहते त्याच्यावर चिडतात. एवढं सारं असतानाही हाच आकाश चोप्रा सध्या सर्वाधिक मानधन घेणारा हिंदी कॉमेंटेटर आहे, हे देखील विसरता कामा नये.
आपला आकाशवाणी नावाचा शो असो, नाहीतर इंस्टाग्रामवर रील्स बनवून, टेनिस क्रिकेटच्या पोरांच्या खेळाला आपला आवाज देणे असो. या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांच्या नेहमी जवळ राहतो. जेव्हा कधी धोनी तुफान बॅटिंग करतो त्यावेळी, आकाश चोप्राच्या तोंडून ‘माही मार रहा है’ हे ऐकल्यावर कान तृप्त झाल्याशिवाय राहत नाहीत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतरत्न! ‘हे’ ४ भारतीय खेळाडू होऊ शकतात देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित
चल हवा येऊ दे! रूडचा मूड ऑफ करत नदालने पुन्हा दाखवून दिले, ‘आपणच आहोत लाल मातीचे बादशाह’
रणजी ट्रॉफीसाठी खेळाडूंचं सिलेक्शन होतं तरी कसं, काय खटाटोप करावा लागतो? जाणून घ्या एका क्लिकवर