मुंबई | इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल प्रक्षेपणाचे हक्क ‘स्टार इंडिया’ कंपनीला मिळाले आहे. अनेक मोठ्या कंपन्या यासाठी लिलावात असताना ‘स्टार इंडिया’ने तब्बल १६ हजार ३४७ कोटी रुपयांची बोली लावत प्रक्षेपणाचे हक्क मिळवले आहे.
हे हक्क २०१८ ते २०२२ या पाच वर्षासाठी असून प्रत्येक वर्षाला बीसीसीआयला ३ हजार २६९ कोटी मिळणार आहे. या लिलावातून बोर्डाला अंदाजे २० हजार कोटी रुपये मिळण्याचा अंदाज होता. परंतु अपेक्षेप्रमाणे बोर्डाला पैसे मिळाले नाहीत. गेली अनेक वर्ष सोनी कंपनी ही आयपीएलच प्रसारण करत होती.
सोनी यासाठी गेले १० वर्ष ८२०० रुपये मोजत होते. २०१३-२०१७ या कालावधीत हक्कांच्या रकमेपेक्षा ही रक्कम तब्बल चौपट आहे. सध्या स्टार स्पोर्ट्सकडे इंग्लंडचा भारतातील दौरा, ऑस्ट्रेलिया भारतातील दौरा, आयसीसीच्या स्पर्धा आणि आयपीएलचे प्रसारणाचे हक्क आहेत. सध्या भारतीय संघाचा एक सामना प्रसारण करण्याचे ४३ कोटी तर आयपीएल प्रसारणाचे तब्बल ५४.४९ कोटी भारतीय क्रिकेट बोर्डाला मिळणार आहे.
सध्या इंटरनेट आणि मोबाइल हक्कांसाठी रिलायन्स जिओ, फेसबुक, टाइम्स इंटरनेट, भारती एरटेल, स्टार इंडिया आणि सोनी ह्या कंपनी बोली लावणार आहेत.