---Advertisement---

ब्रेकिंग! टी20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, स्टार वेगवान गोलंदाजाचा समावेश

On: गुरूवार, सप्टेंबर 15, 2022 5:33 PM
Pakistan Cricket Team
---Advertisement---

ऑस्ट्रेलियामध्ये 16 ऑक्टोबरपासून टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022च्या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डने संघ गुरूवारी (15 सप्टेंबर) जाहीर केला आहे. पाकिस्तान क्रिकेटने (Pakistan Cricket) त्यांच्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरून याची घोषणा केली आहे. आठव्या टी20 विश्वचषकामध्ये पाकिस्तानचे नेतृत्व बाबर आझम (Babar Azam) याच्याकडे सोपवले आहे, तर शादाब खान हा उपकर्णधार आहे. 15 सदस्यीय या संघामध्ये अनेकांनी संघपुनरागमन केले आहेत. यातील एकाने तर एकही आंतरराष्ट्रीय टी20 विश्वचषक खेळलेला नाही.

पाकिस्तानमध्ये शान मसूद याला घेतले आहे. त्याने अजून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. तर हैदर अली आणि शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) यांचे संघपुनरागमन झाले आहे. अलीने पाकिस्तानकडून शेवटचा सामना डिसेंबर 2021 मध्ये खेळला आहे. तर आफ्रिदी हा दुखापतीनंतर संघात परतला आहे. त्याला दुखापतीमुळे आशिया चषकाला मुकावे लागले होते.

विशेष म्हणजे स्फोटक फलंदाज फखर जमान याला मुख्य संघातून बाद केले आहे. तर त्याला राखीव खेळाडूंमध्ये जागा देण्यात आली आहे. फखरला त्याच्या निराशाजनक कामगिरीमुळे वगळले आहे. त्याने यावर्षी 7 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत 13.71च्या सरासरीने 96 धावा केल्या आहेत. त्याला गुडघ्याच्या दुखापतीमुळे बाहेर केले गेले, असे विधान पुढे येत आहे. तसेच दिग्गज शोएब मलिक याच्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे.

शान मसूद याने इंग्लंडच्या टी20 ब्लास्टमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने पाकिस्तानकडून कसोटी आणि वनडे सामने खेळले असून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2021मध्ये खेळला. तसेच अलीला फखरच्या जागी घेण्यात आले आहे.

https://twitter.com/TheRealPCB/status/1570380386672189440?s=20&t=00I-mi1ipG9-Q0Qn-gg7XA

टी20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, हैदर अली, हॅरिस रउफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी , शान मसूद, उस्मान कादिर.

राखीव: फखर जमान, मोहम्मद हरीस, शाहनवाज दहानी

या स्पर्धेत पाकिस्तानचा पहिला सामना भारताविरुद्ध आहे. हा सामना 23 ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तब्बल 17 वर्षांनी टीम इंग्लंडने ठेवले पाकिस्तानात पाऊल; असे झाले स्वागत
टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजीचे भविष्य आहेत ही पंचरत्ने
पंधरा वर्षांचा दुष्काळ संपवत भारत उंचावेल का टी20 विश्वचषक? महान कर्णधाराने वर्तवले भाकित

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---