अलिकडेच आयपीएल मेगा लिलाव (IPL Mega Auction 2025) आयोजित करण्यात आला होता. या मेगा लिलावात न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विल्यमसन (Kane Williamson) अनसोल्ड ठरला होता. आता, विल्यमसन पाकिस्तान सुपर लीगच्या (Pakistan Super League) लिलावात देखील अनसोल्ड ठरला. अशाप्रकारे, केन विल्यमसन आयपीएल (IPL) आणि पाकिस्तान सुपर लीग (PSL) दोन्हीमध्ये अनसोल्ड ठरला.
आयपीएलमध्ये केन विल्यमसन (Kane Williamson) सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) तसेच गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) भाग होता. विल्यमसन जगभरातील अनेक लीगमध्ये खेळतो. ज्यामध्ये कॅरिबियन प्रीमियर लीग, दक्षिण आफ्रिका टी20 आणि टी20 ब्लास्ट यांसारख्या लीगचा समावेश आहे.
केन विल्यमसनच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने आयपीएलमध्ये 79 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 125.62च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 2,188 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची फलंदाजी सरासरी 35.47 राहिली आहे. केन विल्यमसनने आयपीएलच्या इतिहासात 18 अर्धशतके झळकावली आहेत. आयपीएलमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 89 राहिली आहे.
पाकिस्तान सुपर लीगच्या प्लॅटिनम श्रेणीमध्ये ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक खेळाडू आहेत. ज्यामध्ये अॅश्टन अगर, डेव्हिड वॉर्नर आणि डॅनियल सॅम्स सारखे खेळाडू असतील. याशिवाय ऑस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजाने देखील यासाठी आपले नाव नोंदवले आहे. अफगाणिस्तानच्या खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर, मुजीब उर रहमान, नवीन उल हक सारखे खेळाडू आहेत. तसेच, सॅम बिलिंग्ज, टायमल मिल्ससह इंग्लंडच्या 6 खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहिर, रॅसी व्हॅन डर ड्यूसेन, रीझा हेंड्रिक्स आणि तबरेज शम्सी यांसारखी आघाडीची नावे समाविष्ट आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
दिल्ली विमानतळावर भारतीय खेळाडूसोबत गैतवर्तन, फ्लाईटही चुकली; इंस्टा स्टोरी द्वारे संताप व्यक्त
तेम्बा बवुमा कर्णधार, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिकेनं जाहीर केला घातक संघ!
आता आयपीएल खेळाडूंवर दया नाही, बीसीसीआयनं नियमात केला मोठा बदल!