आगामी इंडियन प्रीमियर लीगपूर्वी (Indian Premier League) मेगा लिलाव होणार आहे. त्यासाठी सर्व संघांनी बीसीसीआयने (BCCI) दिलेल्या नव्या नियमांनुसार आपली रिटेन्शन यादी जाहीर केली आहे. आगामी मेगा लिलावाची तारीख देखील घोषित करण्यात आली आहे. तत्पूर्वी स्टार खेळाडू केएल राहुलने (KL Rahul) 2025च्या आयपीएल हंगामात कोणत्या संघाकडून खेळायला आवडेल? याबद्दल आपली इच्छा व्यक्त केली आहे.
खरे तर, शेवटच्या आयपीएल हंगामात लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघ सलग सामने हरत असताना संघाचे मालक संजीव गोयंका (Sanjiv Goenka) यांनी कर्णधार केएल राहुलला (KL Rahul) मैदानातच खडसावले होते. तेव्हापासून केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्स सोडणार अशी चर्चा होती आणि तसेच झाले. लखनऊची आयपीएल 2025ची रिटेन्शन यादी आली तेव्हा केएल राहुलचे नाव त्यामध्ये नव्हते.
स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत केएल राहुल (KL Rahul) म्हणाला, “मला नव्याने सुरुवात करायची होती. मला माझे पर्याय पहायचे होते. मला अशा संघात खेळायचे आहे जिथे मला थोडे स्वातंत्र्य असेल आणि संघातील वातावरण हलके असेल. कधीकधी तुम्हाला स्वत:हून पुढे जावे लागेल आणि स्वतःसाठी काहीतरी चांगले पाहावे लागेल.”
KL Rahul said, “I wanted to start fresh, I wanted to explore my options and and I wanted to go and play where I could find some freedom. The team atmosphere would be lighter, sometimes you just need to move away and find something good for yourself”. (Star Sports). pic.twitter.com/gFfALa2iDH
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 11, 2024
केएल राहुल याआधी तो पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (Royal Challengers Bangaluru) या संघांसाठी खेळला आहे. त्याने पंजाब किंग्जचे नेतृत्वही केले होते. आयपीएल 2025च्या लिलावापूर्वी पंजाब किंग्जने त्यांच्या कर्णधाराला सोडले आहे. अशा परिस्थितीत ते पुन्हा एकदा केएल राहुलला टार्गेट करू शकतात. याशिवाय आरसीबी देखील केएल राहुलला खरेदी करू शकते अशी अटकळ बांधली जात आहे.
केएल राहुलच्या (KL Rahul) आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने आयपीएलच्या इतिहासात 132 सामने खेळले आहेत. त्यामध्ये राहुलने 45.47च्या सरासरीने फलंदाजी करताना 4,683 धावा केल्या आहेत. राहुलने आयपीएलमध्ये आतापर्यंत 37 अर्धशतकांसह 4 शतके झळकावली आहेत. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 134.61 राहिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबईनं केलं रिटेन, पण हार्दिक नाही खेळणार आयपीएलचा पहिला सामना, कारण काय?
भारताशिवाय चॅम्पियन्स ट्राॅफी खेळली जाऊ शकते, माजी कर्णधाराचे मोठे वक्तव्य!
IPL 2025; अक्षर पटेल होणार दिल्लीचा नवा कर्णधार? मेगा लिलावापूर्वीच मोठा खुलासा