भारताचा स्टार डावखुरा फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. त्याने ऑगस्ट महिन्यात सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत निवृत्तीबद्दल चाहत्यांना माहिती दिली होती. पण आता त्याने निवृत्तीचा निर्णय का घेतला? यावर वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की, राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची कोणतीही ‘प्रेरणा’ शिल्लक राहिली नव्हती.
शिखर धवन (Shikhar Dhawan) म्हणाला, “मी मागे वळून पाहिले तर गेल्या दोन वर्षांत मी फारसे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नव्हतो आणि मी फक्त आयपीएल खेळत होतो. त्यामुळे मी जास्त क्रिकेट खेळणे कमी झाले होते.”
धवनच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी 34 कसोटी, 167 एकदिवसीय आणि 68 टी20 सामने खेळले आहेत. 34 कसोटी सामन्यात त्याने 40.61च्या सरासरीने 2,315 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये धवनने 5 अर्धशतके आणि 7 शतके झळकावली आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 190 राहिली. 167 एकदिवसीय सामन्यात त्याने 44.11च्या सरासरीने 6,793 धावा केल्या. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 91.35 राहिला. वनडेमध्ये त्याने 39 अर्धशतके आणि 17 शतके झळकावली आहेत, तर 68 टी20 सामन्यात त्याने 1,759 धावा केल्या आणि 11 अर्धशतके झळकावली.
2021 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या वनडेमध्ये धवन भारताचा 25वा कर्णधार बनला होता. दरम्यान त्याने रोहितच्या जागी कर्णधारपद स्वीकारले होते. धवनने 12 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले, ज्यामध्ये भारताने 7 सामने जिंकले, तर 3 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, गेल्या वर्षी वनडे विश्वचषकापूर्वी भारतासाठी त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना डिसेंबर 2022 मध्ये ठरला.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs BAN: टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची कधी होणार घोषणा?
IPL 2025 Retention Update: किती खेळाडूंना रिटेन करता येणार?
“तू मूर्ख नाही, मी मूर्ख आहे” स्टार खेळाडूने सांगितला धोनीचा किस्सा