---Advertisement---

VIDEO: ‘नंबर वन मेरा इंडिया’ आशिया कपचे स्फूर्तीदायी ऍंथम सॉंग रिलीज

On: शनिवार, जुलै 23, 2022 9:10 PM
asia cup ind
---Advertisement---

मागील चार वर्षांपासून रखडलेला आशिया चषक यावर्षी होणार आहे. २०१८ मध्ये अखेरच्या वेळी ही मानाची स्पर्धा पार पडली होती. यंदा श्रीलंकेला स्पर्धेचे यजमानपद दिले गेलेले.‌ मात्र, श्रीलंकेतील राजकीय परिस्थिती अत्यंत खराब असल्याने स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळली जाणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पष्ट केले आहे. आता स्पर्धेचे प्रसारण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्सने या आशिया चषकासाठी अँथम सॉंग रिलीज केले.

आगामी आशिया चषकाचे प्रसारण हक्क स्टार समूहाकडे आहेत. ते प्रत्येक मोठ्या स्पर्धेआधी त्या स्पर्धेचे अँथम सॉंग रिलीज करत असतात. त्यांनी आशिया चषकासाठीदेखील एक नवे कोरे गाणे रिलीज केले. “नंबर वन मेरा इंडिया, जितना है अब एशिया” असे या गाण्याचे बोल आहेत. स्टार स्पोर्ट्सने आपल्या सोशल मीडिया खात्यांवरून हे गाणे रिलीज केले. अल्पावधीतच या गाण्याला चांगली प्रसिद्धी मिळत आहे.

गतविजेता भारत हा स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. भारताने आतापर्यंत सात वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. पाच विजेतेपदांसह श्रीलंका दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी संघ बनतो. २०२२ च्या आशिया चषकात भारत, अफगाणिस्तान, श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेश हे पाच पूर्ण-सदस्य संघ असतील. हॉंगकॉंग, सिंगापूर, कुवेत आणि युएई यांच्यात सुपर सिक्समधील अंतिम स्थान निश्चित करण्यासाठी मुख्य स्पर्धेपूर्वी एक पात्रता फेरी खेळली जाईल.

स्पर्धा युएईत होण्याची शक्यता

आशिया चषकाचे मूळ यजमान श्रीलंका त्यांच्या देशातील राजकीय परिस्थितीमुळे ही स्पर्धा भरवण्यास असमर्थ असल्याचे, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सांगितले आहे. त्यामुळे ही स्पर्धा युएईत पार पडेल. २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत दुबई, अबुधाबी व शारजा या तीन शहरांमध्ये आशिया चषक खेळला जाऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज करतोय क्रिकेटच्या मैदानावर कमबॅक; ‘या’ लीगमध्ये होणार सहभागी

‘हाफ पँट’वर क्रिकेट, नको रे बाबा! पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर चहलचे मजेशीर प्रत्युत्तर 

वेस्ट इंडीजविरुद्धच्या लाईव्ह सामन्यात कर्णधार धवनने केले ‘हे’ कृत्य, समालोचकांच्याही बत्त्या गुल 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---