खेळ म्हटलं की सर्वात महत्त्वाचा असतो फिटनेस. आजकाल सार्याच खेळांमध्ये फिटनेसला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालय. तुमच्याकडे एक टक्का कमी स्किल असल तरी चालेल, पण फिटनेस १००% पाहिजेच. भारतात क्रिकेटर विराट कोहलीसह अन्या खेळातील अनेक युवा खेळाडूंनी फिटनेससाठी सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. असे असतानाही काही क्रिकेटर असे आहेत, ज्यांनी शारिरिक कमतरता असतानाही त्यावर मात करत एक दैदीप्यमान करियर बनवलं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पण त्याच शारीरिक व्यंग असलेल्या पण क्रिकेट इतिहासात अजरामर झालेल्या, क्रिकेटर्सविषयी माहिती करून घेऊ.
चंद्रशेखर
६० आणि ७० च्या दशकात भारताच्या स्पिन चौकडीने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. बिशनसिंग बेदी, इरापल्ली प्रसन्ना, भागवत चंद्रशेखर आणि व्यंकट राघवन हे जगातील सार्या बॅटर्ससाठी एक कोड बनलेले. त्यापैकी एक असलेले चंद्रशेखर हे आपल्या पूर्ण क्षमतेने कधी खेळूच शकले नाहीत. कारण ते ज्या उजव्या हाताने बॉलिंग करायचे त्या, हाताला त्यांना पोलिओ झाला होता. त्यांची बॉलिंग ॲक्शनही वेगळीच होती, पण त्यांनी आपल्या याच कमजोरीला आपली ताकद बनवली. आणि २४२ विकेटसह भारतीय क्रिकेट इतिहासात मानाचे स्थान मिळवले.
हेही पाहा- व्यंग हीच ताकद बनवत स्टार बनलेले क्रिकेटर्स
मार्टिन गप्टील
न्यूझीलंडचा क्रिकेटर रॉस टेलर रिटायर झाल्याने आता, त्यांचा सर्वात सीनियर क्रिकेटर बनला आहे ओपनर मार्टिन गप्टील. तुम्ही म्हणाल ग्राउंडवर इतका धडधाकट दिसणारा, चित्त्यासारखी फिल्डिंग करणारा आणि तुफान बॅटिंग करणारा गप्टील या यादीत कसा?… पण होय ग्राउंडवर एकदम फिट दिसणार्या गप्टीललाही एक शारीरिक व्यंग आहे. त्याच्या डाव्या पायाला तीन बोटेच नाहीत. लहानपणी झालेल्या एका अपघातात त्याला आपली तीन बोटे गमवावी लागली. सुरुवातीला त्याला नीट चालताही येत नव्हते. कुटुंबाने त्याला कधीही खचू दिले नाही आणि मार्टिनने मेहनत घेतली. आज मार्टिन गप्टील हे नाव लिमिटेड ओव्हर्सर्स क्रिकेटमध्ये अत्यंत आदराने घेतले जाते. १३ हजार इंटरनॅशनल रन्स त्याच्या यशाची पावती देतात.
शोएब अख्तर
या यादीमधील तिसरे नाव ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसू शकतो. कारण, हे नाव आहे जगातील आजवरचा सर्वात फास्ट बॉलर रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तरचं. समोरून दिसताना अख्तर किती जरी धिप्पाड वाटत असला तरी, त्याला एक नव्हे तर दोन फिजिकल डिसाबिलिटी आहेत. पहिले तर त्याचा हात ४० डिग्रीपर्यंत वाकू शकतो. तुम्हा- आम्हा सामान्य लोकांचा हात हा फक्त २० डिग्री पर्यंतच वाकतो. खरंतर हीच गोष्ट अख्तरची ताकद झाली असे म्हणावे लागेल. त्याचे दुसरे व्यंग म्हणजे त्याचे पाय पूर्णता सपाट आहेत. पाय सपाट असल्याने अख्तर पाच वर्षापर्यंत चाललाही नव्हता. तरीही अख्तर आज जगातील सर्वात वेगवान गोलंदाज हे बिरूद मिरवतो. अगदी अभिमानाने.
जॉन्टी रोड्स
क्रिकेटच्या इतिहासातील आजवरचा बेस्ट फिल्डर कोण? या प्रश्नाचे उत्तर क्रिकेट पाहणारा प्रत्येक जण एकच देईल ते म्हणजे जॉन्टी रोड्स. क्रिकेटच्या मैदानावर नेहमीच हिट राहिलेला जॉन्टी हा फिटग्रस्त आहे हे तुम्हाला माहित होते का?. होय रोड्सला फिट्स येण्याचा सौम्य त्रास होतो. लहानपणापासूनच हा त्रास असल्याने त्याला नेहमी काळजी घ्यायला लागायची. डोक्याला कोणत्याही प्रकारचा आघात होऊ नये म्हणून, तो कधी कधी तर फिल्डिंग करतानाही हेल्मेट घालायचा. याच कारणाने त्याला कधीही त्याचा आवडता रग्बी खेळ खेळता आला नाही. या सर्वावर मात करत तो ऑल टाईम ग्रेट फिल्डर आणि क्रिकेटर बनला.
मन्सूर अली खान पतौडी
आजही इंडियाचे सर्वात यंग कॅप्टन असलेले दिवंगत मन्सूर अली खान पतौडी उर्फ टायगर पतौडी हे तर चक्क एका डोळ्याने अंध होते. इंग्लंडमध्ये एका अपघातात डोळ्यात काच घुसल्याने त्यांना अंधत्व आलेले. सुरुवातीला त्यांना दोन बॉल दिसायचे. त्यापैकी आत येणारा बॉल ते खेळायचे. नंतर त्यांनी एक डोळा कव्हर करून खेळायला सुरुवात केली. इतके मोठे व्यंग असतानाही त्यांनी अनेक वर्ष भारतासाठी क्रिकेट खेळले. इतकेच नव्हे तर त्यांनी टीम इंडियाला लीडही केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेव्हा पहिल्यांदाच IPL खेळाडूला चढावी लागलेली पोलीस स्टेशनची पायरी, आरसीबीशी होतं कनेक्शन
लंबूजी! क्रिकेटच्या मैदानावर ‘या’ खेळाडूंच्या उंचीचीच रंगते चर्चा, ‘टॉप’ला फक्त पाकिस्तानी क्रिकेटर