महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्यामान्यतेने, पुणे जिल्हा कबड्डी असो. आणि उत्कर्ष क्रीडा संस्था-पुणे यांच्या विद्यमाने शुक्र. दि. २८सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०१८ या कालावधीत राज्यस्तरीय “पंच शिबिराचे” आयोजन करण्यात आले आहे.
पुणे येथील सणस मैदान (सारस बागेजवळ) होणाऱ्या या शिबिराकरिता राज्य संघटनेला संलग्न असलेल्या २५ जिल्ह्यातील ८०च्या जवळपास निवडक पंच उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरात पंचांच्या नियमात एकवाक्यता व सुसूत्रता येण्यासाठी तसेच त्यांची मानसिकता आणि शारीरिक तंदुरुस्तीवर यावर तर तज्ञाकडून मार्गदर्शन करण्यात येणारच आहे.
पण यंदा प्रथमच दोन संघांना पाचारण करून त्यांच्यातील सामन्यावर त्यांना उभे करून त्यांच्या बरोबर व चुकीच्या निर्णयाबाबत प्रत्यक्षात त्यांना माहिती करून देण्यात येईल. त्याच बरोबर काही घडलेल्या सामन्यांच्या चित्रफितीवरून त्यातील निर्णयाचे विश्लेषण “स्लो- मोशन”च्या माध्यमातून या शिबिरात दाखविण्याचा संयोजकांचा प्रयत्न आहे.
या शिबिराचे उदघाटन शुक्र. दि. २८ सप्टेंबर २०१८ रोजी दुपारी ४-३०वा. होणार आहे. या शिबिरात सहभागी होणाऱ्या संबंधित पंचांनी दुपारी ३-०० वाजेपर्यंत उपस्थित राहून आपले रु.शंभर (₹ १००/-) शिबीर नोंदणी शुल्क भरावे. सोबत जिल्हा संघटनेचे शिबिरात उपस्थित राहण्याचे अधिकृत पत्र घेऊन यावे अन्यथा शिबिरात प्रवेश दिला जाणार नाही, असे आव्हान राज्य संघटनेचे सचिव आस्वाद पाटील यांनी या पत्राद्वारे केले आहे.
संबंधित जिल्हा संघटनांनी या शिबिरात उपस्थित रहाणाऱ्या पुरुष व महिला पंचांची सविस्तर माहिती अगोदर संयोजकांना भ्रमणध्वनिवरून कळविल्यास निवास व्यवस्था करण्यास सोयीचे जाईल. अधिक माहितीसाठी योगेश यादव – ९८२२१८६१८७ आणि दत्ता झिंजुर्डे – ९८९०८३१८३१/८२०८१३६४९८ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.
महत्त्वाच्या बातम्या-
–Video- बाॅलिंग करेगा या बाॅलर चेंज करे, जेव्हा धोनीला राग येतो
–टीम इंडियाला नडलेल्या अफगाणिस्तान संघावर कौतूकाचा वर्षाव
–पुणेरी पलटण तर्फे प्रो कबडडी लिगच्या सिझन ६ साठी गिरीष एर्नाकची कप्तानपदी निवड